Subodh Bhave In Khupte Tithe Gupte : 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हजेरी लावणार आहे. सुबोध भावेने आजवर लोकमान्य टिळक, बालगंधर्व, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा वेगवेगळ्या बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात सुबोधला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बायोपिकबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला आहे.


'खुप्ते तिथे गुप्ते'च्या एका प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सुबोधला विचारत आहे की,"राहुल गांधी यांचा बायोपिक करण्याची इच्छा आहे का?". यावर उत्तर देत सुबोध भावे म्हणतो,"काय प्रकारे मी त्यांची मुलाखत घेऊ शकतो, असा मी विचार करत होतो आणि माझ्या डोक्यात कल्पना आली की अरे आपण इतके बायोपिक केले आहेत. तर, समजा या कल्पनेने आपण मुलाखतीची सुरुवात केली की माझ्याकडे तुमचा (राहुल गांधी) बायोपिक आलाय. माझ्याकडे कुठलाही बायोपिक येतो तेव्हा मी त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो. तर तसा मला तुमचा अभ्यास करायचा आहे. राहुल गांधी म्हणजे काय आहात? एका व्यक्तिरेखेला आपण तो कसा आहे हे विचारल्यावर त्या अनुषंगाने त्याची उत्तरं येतात". 


सुबोध भावे पुढे म्हणाला,"मी कोणत्या भूमिका करायच्या याचं स्वातंत्र्य मला आहे. तुम्ही तो पाहायचा की नाही याचं स्वातंत्र्य तुमचं आहे. मी राहुल गांधींची भूमिका केली तर तुम्हाला बघायलाच पाहिजे याची मी तुम्हाला जबरदस्ती केलेली नाही". सुबोध भावेच्या उत्तराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


सुबोध भावेने नाकारलेला 'डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा 


सुबोध भावे म्हणाला,"डॉ. काशिनाथ घाणेकर' या बायोपिकसाठी मला विचारणा झाली तेव्हा मी नकार दिला होता. मला बायोपिकचा कंटाळा आला होता. त्यामुळे या सिनेमासाठी विचारणा झाली तेव्हा तुम्हीच करा, असं उत्तर मी दिलं होतं". कोणत्या नटाने केलेली शिवाजी महाराजांची भूमिका आवडते? याबद्दल बोलताना सुबोध म्हणाला,"अमोल कोल्हे". 


सुबोध भावेने 'या' कारणाने मंजिरीला रक्ताने पत्र लिहिलं होतं? 


सुबोध आणि मंजिरी भावे यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी असली तरी अभिनेत्याने त्याच्या पत्नीला एकदा रक्ताने लिहिलेलं पत्र दिलं होतं. याबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला,"एकदा मी आणि माझा मित्र सिंहगडाजवळ गेलो होतो. त्यावेळी मंजिरीदेखील तिथे येईल याचा मला अंदाज नव्हता. दरम्यान सिंहगडाखाली मी सिगरेट ओढत होतो. मंजिरीने मला पाहिलं आणि चिडून निघून गेली. त्यानंतर माझी चूक झाली असं सांगत मी विनवण्या केल्या. पण ती ऐकूण घ्यायला तयार नव्हती. त्यामुळे मी रक्ताने तिला पत्र लिहिलं". 


संबंधित बातम्या


Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना सुबोध भावे देणार उत्तरं; ‘खुपते तिथे गुप्ते'चा प्रोमो व्हायरल