Khupte Tithe Gupte :
सुप्रिया सुळे या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या प्रोमोच्या सुरुवातील दिसते की,अवधूत गुप्ते हा सुप्रिया सुळे यांचे ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या मंचावर स्वागत करतो. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे काही फोटो स्क्रिनवर दिसतात. त्यानंतर प्रोमोमध्ये दिसते की, सुप्रिया सुळे या भावूक होतात. सुप्रिया सुळे यांना अवधुत गुप्ते म्हणतो, 'तुम्ही कार्यक्रमाच्या आधी आम्हाला सांगितलं होतं की, आम्ही आमच्या भावना सगळ्यांसमोर दाखवू शकत नाही. पण आता काय सांगाल?'
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे या कोणकोणत्या विषयांबद्दल बोलणार, तसेच अवधूत गुप्ते त्यांना कोणते प्रश्न विचारणार हे पाहण्यास आता प्रेक्षक उत्सुक आहेत.
पाहा प्रोमो:
अवधूत गुप्ते हा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमामध्ये आलेल्या सेलिब्रिटींना तसेच नेत्यांना विविध विषयांवर आधारित असणारे प्रश्न विचारत असतो. राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आता सुप्रिया सुळे या कार्यक्रमात विविध विषयांवरील मतं मांडताना दिसणार आहेत.
खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते हे विविध विषयांवर चर्चा करत असतात. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये कलाकार मजेशीर किस्से तसेच आठवणी देखील सांगतात. आता खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :