Kedar Shinde on Bigg Boss Marathi new Host : दोन वर्षांपासून प्रतीक्षा असलेला बिग बॉसचा (Bigg Boss Marathi New Season) खेळ जुलै महिन्यात सुरु झाला. पण सुरुवातीलाच प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं. बिग बॉसचा होस्ट म्हणून महेश मांजरेकर यांच्या ऐवजी रितेश देशमुख त्या खुर्चीत बसला. त्यामुळे प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हापासून महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) होस्ट का नाहीत? असा प्रश्न बिग बॉस प्रेमींना कायमच पडत आलाय. त्यावर आता केदार शिंदे (Kedar Shinde) यांनीच भाष्य केलंय. 


केदार शिंदे यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅचअपमध्ये मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी रितेशची निवड का केली? यावर भाष्य केलंय. त्याचप्रमाणे रितेशच्या होस्टिंगवरही त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. आर्याला बिग बॉसने घरातून बाहेर काढल्यानंतर बिग बॉसवर प्रेक्षकांकडून बरीच नाराजी व्यक्त केली जातेय. त्यातच होस्ट म्हणून रितेशलाही बरंच ट्रोल केलं जातंय. असं असलं तरीही त्याच्या होस्टिंगमुळे शोला उभारी मिळत असल्याचं मतंही केदार शिंदे यांनी व्यक्त केलंय. 


'बिग बॉस हा तरुण असायला पाहिजे'


केदार शिंदे यांनी म्हटलं की, 'बिग बॉसची तयारी फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. पण हा सगळा प्रवास फार आव्हानात्मक होता. कारण बिग बॉसचे चार सीझन झाले, जे सो कॉल्ड लोकांना आवडले असतील, पण ते गाजले नव्हते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रितेश देशमुखसारखा होस्ट मिळावा लागतो. महेश दादाविषयी मला अत्यंत प्रेम आहे. पण जेव्हा असं ठरलं की, यावेळचा बिग बॉस हा तरुण असायला पाहिजे, तो थोडा वयाने आताचा असायला हवा. तेव्हा आम्ही रितेश भाऊंकडे गेलो, त्यांना सगळं सांगितलं. त्यांनीही ती जबाबदारी स्वीकारली.' 


पुढे त्यांनी म्हटलं की, शंभर टक्के पहिल्या दिवसापासून रितेश भाऊ आणि महेश मांजरेकर यांच्यात तुलना होणारच होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सुनील गावस्कर चांगलाच खेळायचा पण सचिन तेंडूलकरही वाईट नव्हता खेळत. शेवटी प्रत्येकाची एक स्टाईल असते.                                             


ही बातमी वाचा : 


Stree 2 OTT Release: सिनेमागृहानंतर आता 'तो' तुमच्या घरी येणार, कधी आणि कुठे पाहाल 'स्त्री-2'?