Kaun Banega Crorepati 14 : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन होण्यासोबत त्यांच्या ज्ञानातदेखील भर पडत असते. या कार्यक्रमाचे तेरा पर्व चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. आता 8 ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती'च्या 14 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे.
नुकताच 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हॉट सीटवरून बसून स्पर्धकाला 1 कोटी जिंकण्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच स्पर्धकाला विचारात आहेत, 7.5 कोटींसाठी खेळशील की खेळ की थांबशील. या प्रश्नानंतर स्पर्धक विचारात पडतो".
'कौन बनेगा करोडपती 14' चा नवा नियम
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळत असतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे.
8 ऑगस्टपासून सुरू होणार 'कौन बनेगा करोडपती 14'
ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार 'कौन बनेगा करोडपती 14' 8 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सोनी टीव्हीवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाल्याने प्रेक्षक आता कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या