Kavya Anjali Sakhi Saavali : 'काव्यांजली- सखी सावली' (Kavya Anjali Sakhi Saavali) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अशातच आता 'काव्यांजली' मालिकेतून सानिका काशीकरची एक्झिट झाली आहे. त्यामुळे श्रेष्ठाची भूमिका कोण साकारणार याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे.


'काव्यांजली' मालिकेतून सानिका काशीकरची एक्झिट!


'काव्यांजली- सखी सावली' या मालिकेत काव्या आणि अंजली या दोघी बहिणींच्या जोडीला तसेच प्रितम-अंजली या जोडप्याला ही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. मालिकेतील श्रेष्ठा व निकिता यांची कायमच विश्वजीत आणि प्रितमला काव्या व अंजलीपासून दूर करण्याचे कारस्थान चालू असतं. या मालिकेत श्रेष्ठाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका काशीकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.






‘ही’ अभिनेत्री साकारणार श्रेष्ठाची भूमिका


सानिका काशीकरने मालिका सोडली असून आता अभिनेत्री अपूर्वा परांजपे या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. श्रेष्ठाची नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांना तितकीच पसंतीची आहे. काव्यांजलीमध्ये नवीन श्रेष्ठाची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे.


प्रेमाच्या नात्यात गुंफलेली दोन बहिणींची गोष्ट


'काव्यांजली' या मालिकेत एकमेकींवर खूप प्रेम करणाऱ्या दोन जिवाभावाच्या बहिणींची गोष्ट दाखवण्यात आली आहे. दोघी चुलत बहिणी असल्या तरी त्यांचं नातं आई-मुलीसारखं आहे. अंजलीचा जन्म झाल्यापासून ती काव्याची मानसकन्या झाली. काव्याचं लग्न झाल्यानंतर अंजलीने घराची जबाबदारी उचलली. काव्या सासरी सगळ्या जबाबदाऱ्या चोख निभावते आहे. आता या दोन बहिणींच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवले आहे हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये कळेल. 


दोन बहिणींची समांतर चाललेली नशीबं कुठे येऊन जुळतील का? दोघींनी एकमेकींच्या सुखी संसाराची जी स्वप्नं पाहिली होती, ती पूर्ण होतील की धुळीला मिळतील? नात्यांमधल्या प्रेमाची त्यांची आस पूर्ण होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तर मालिकेत मिळतील.


काव्यांजली - सखी सावली (Kavya Anjali Sakhi Saavali)
कुठे पाहाल? कलर्स मराठी
किती वाजता? सोम-शनि रात्री 8.30 वाजता


संबंधित बातम्या


Kavya Anjali Sakhi Saavali : प्रेमाच्या नात्यात गुंफलेली दोन बहिणींची गोष्ट; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय नवी मालिका 'काव्यांजली सखी सावली'