Sunny Leone Supports Ankita Lokhande: छोट्या पडद्यावरील  'बिग बॉस 17' (Bigg Boss 17)  या कार्यक्रमाचा फिनाले आता काही दिवसांवर आला आहे. घरातील स्पर्धक  टॉप 3 मध्ये आपले स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी बिग बॉसच्या स्पर्धकांना सपोर्ट करत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) अनेकांनी सपोर्ट केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) खास पोस्ट शेअर करुन अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला आहे.


सनी लिओनीने शेअर केलं ट्वीट


अंकिताला तिचे चाहते वोट करत आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अंकिताला पाठिंबा देत आहेत.  अंकिताने हा शो जिंकावा, असेही अनेक सेलिब्रिटींनी म्हटले आहे. आता सनी लिओनीने अंकिताला सपोर्ट केला आहे. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, "अंकिता  बिग बॉस 17 च्या फिनालेसाठी तुला  शुभेच्छा . मी तुझ्या पाठीशी उभी आहे."


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


सनी लिओनीच्या ट्विटर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट केली- "हो अंकिता लोखंडेच जिंकणार". तर दुसऱ्याने कमेंट केली, "अंकिताला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद"






सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंहने देखील अंकिताला सपोर्ट केला आहे. सोशल मीडियावर अंकिताचा तिच्या आईसोबतचा फोटो शेअर करत श्वेतानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"अंकिता आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू खूप प्रामाणिकपणे खेळत असून कमाल आहेस". 


अंकिता आणि विकीचं बिग बॉसच्या घरात भांडण


अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडमध्ये भांडताना दिसत आहेत.  या दोघींना रोजची भांडणं पाहून प्रेक्षकही वैतागले आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून त्यांच्यात भांडण होते. काही दिवसांपूर्वी अंकिताची आई आणि विकीची आई या बिग बॉसच्या घरात गेल्या होत्या. यावेळी दोघींनीही अंकिता आणि विकीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघी घराच्या बाहेर गेल्यानंतर देखील अंकिता आणि विकीमध्ये भांडणं झाली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा पाठिंबा; म्हणाली,"तू कमाल आहेस"