The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात.  शोमधील कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, असं म्हटलं जात आहे.


‘द कपिल शर्मा शो’ चा सध्या चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिझनमध्ये देखील बऱ्याच सेलिब्रिटींनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. आता हा शो बंद होणार आहे, असं म्हटलं जात आहे. याबाबत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कपिलनं सांगितलं.


काय म्हणाला कपिल? 


जून महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार आहे, असं म्हटलं जात होतं. आता 'हा शो खरच बंद होणार आहे का?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये कपिलला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत कपिल म्हणाला, 'हे अजून निश्चित झालेले नाही. आम्हाला जुलैमध्ये टूरसाठी यूएसएला जायचे आहे आणि नंतर आम्ही याबबात विचार करु. अजून बराच वेळ आहे.'


काही दिवसांपूर्वी 'कपिल शर्मा शो'मध्ये  ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली. 21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'कपिल शर्मा शो'मध्ये   ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामधील गाण्यांवर कपिल शर्मा आणि या चित्रपटाच्या टीमनं डान्स देखील केला.






'कपिल शर्मा शो'चा चौथा सिझन गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झाला होता. हा सीझन खूप चर्चेत होता.  'कपिल शर्मा शो'च्या चौथ्या सिझनमध्ये मोटिव्हेशनल स्पीकर, गायक, तसेच सेलिब्रिटींनी या सिझनमध्ये हजेरी लावली.  कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि भारती सिंह यांसारख्या स्टार्सनी हा शो सोडला आहे. 23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली.  कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Saurav Gurjar: द कपिल शर्मा शोवर भडकला 'ब्रह्मास्त्र' मधील अभिनेता; म्हणाला, 'कपिल तू प्रेक्षकांना हसवतो पण तुझी टीम...'