Kaun Banega Crorepati 13 Guest : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख कौन बनेगा करोडपतीच्या प्रत्येक पर्वात दिसून आला आहे. रितेश आणि जेनेलिया बॉलिवूडची सगळ्यात गोड जोडी आहे. ही गोड जोडी 'कौन बनेगा करोडपती 13' च्या स्पेशल भागात प्रमुख पाहुणी म्हणून आली होती. तसेच रितेश आणि जेनेलिया अमिताभ बच्चन सोबत खेळ देखील खेळले. तिघे एकत्र खूप मज्जा-मस्ती करताना दिसून आले होते. पण दोघांनी एका प्रश्नासाठी लाइफलाईनचा वापर केला. 25,00,000 च्या प्रश्नासाठी जेनेलिया आणि रितेशने 50-50 लाइफलाईनचा आणि एक्सपर्टचा सल्ला घेणाऱ्या लाइफलाईनचा वापर केला. 


अमिताभ बच्चनने जेनेलिया आणि रितेशला एक प्रश्न विचारला होता की, सर्वाधिक फॉलो केले जाणारे इंस्टाग्राम अकाउंट कोणाचे आहे? त्या प्रश्नाला ऑप्शन होते, A-नासा, b-क्रिस्टियानो रोनाल्डो, C-एरियाना ग्रांडे, D-इंस्टाग्राम. या प्रश्नावर रितेश आणि जेनेलिया क्रिस्टियानो आणि इंस्टाग्रामच्या उत्तरावर गोंधळले होते. 


जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख त्यादरम्यान हैरान झालेले दिसून आले. रितेश आणि जेनेलियाची मुलं रियान आणि राहिलदेखील स्क्रीनवर दिसले होते. त्यांनी त्यांच्या आईवडिलांबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या. दोघेही आई वडिलांना 'वी लव यू' म्हणताना दिसून आले. मुलांना पाहताच जेनेलियाच्या डोळ्यात पाणी आले. त्यामुळे तिने केबीसीला या खास भेटीसाठी धन्यवाद दिले. दोघे अनेक वर्षे एकत्र होते. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 ला दोघांनी लग्न केले.  


प्रेक्षकांनी रितेशला अभिनय करताना आणि एक चांगला पती आणि वडील बनलेला पाहिलेला आहे. त्याने विनोदी, थ्रिलर, रोमॅंटिक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. पण खूप कमी जणांना माहिती आहे की, तो एक आर्किटेक्टदेखील आहे. कार्यक्रमात आर्किटेक्चरसंबंधी एक प्रश्न विचारला होता ज्याचे उत्तर रितेशने ताबडतोब दिले. दरम्यान रितेश म्हणाला, त्याने 5 वर्षांचा आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यावर बिग बी रितेशला 'परफेक्शनिस्ट' म्हणाले. 


रितेश बिग बीच्या "कभी कभी" चित्रपटातील डायलॉग जेनेलियावर मारताना दिसून आला आहे. तो डायलॉग गुडघ्यावर बसून बोलताना दिसून येत आहे. जेनेलिया देशमुख लाजत असताना रितेश म्हणाला, "मेरे लिए जहा तुम खडी हो जाती हो, लाइन वही से शुरू हो जाती है". तर रितेश पुढे म्हणाला, 'नात्याने मी तुझा नवरा असलो तरी नाव आहे जेनेलियाचा नवरा'. रितेशच्या त्या डायलॉगवर त्याची पत्नी जेनेलिया म्हणाली, 'किती गोड आहे'. तर रितेशच्या या भाष्यावर बिग बी म्हणाले, "वाह वाह".