Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी रहिवासी संघात आज एका नवीन स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने नुकताच प्रोमो शेअर केला आहे. त्यामुळे आता घरात कोणता सदस्य जाणार, घरात जाऊन तो कोणाच्या गटात सामिल होणार, की स्वत:च नवीन गट निर्माण करणार, बिग बॉसच्या घरातील सदस्य नव्या सदस्याचा स्वीकार करणार का? अशा अनेक चर्चा प्रेक्षकांमध्ये होत आहेत.
शनिवारी बिग बॉसच्या चावडीवर विकेन्डचा डाव रंगत असतो. त्यामुळे घरातील स्पर्धकांची महेश मांजरेकर शाळा घेताना दिसून येणार आहेत. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर जयला ओरडताना दिसून येत आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक टास्क रंगले होते. या टास्कमध्ये स्पर्धकांना घराचा ताबा मिळविण्यासाठी टास्क खेळावे लागत होते. घरातील स्पर्धकांनी टास्कमध्ये भांडणतंटे केली होती. त्यामुळे या आठवड्यात घरात नुसताच गोंधळ होता.
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात देखील कॅप्टन नसणार आहे. सलग दुसरा आठवडा बिग बॉसच्या घरात कॅप्टन नसल्याने बिग बॉसच्या घरात कोणाची दादागिरी चालणार नाही. काल बिग बॉसच्या घरात कॅप्टन निवडण्यासाठी स्पर्धक अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे घरात कॅप्टन नसेल असे बिग बॉसने जाहीर केले.
कॅप्टन निवडण्यासाठी काल बिग बॉसच्या घरात रंगला होता "डान्स पे चान्स" कॅप्टनसी टास्क. घरातील सदस्यांनी या टास्कसाठी एकसे बढकर एक गेटअप केले होते. अक्षय वाघमारे-दादुस, अविष्कार दारव्हेकर-मीनल शाह, गायत्री दातार-उत्कर्ष शिंदे, सोनाली पाटील-मीरा जगन्नाथ, तृप्ती देसाई-स्नेहा वाघ-विकास पाटील या जोड्यांमध्ये टास्क रंगणार आहे. अविष्कार आणि दादूस बिग बॉसच्या घरातले सलमान खान आणि गोविंदा होते. तसेच घरातील सदस्यांनी विविध चित्रपटांतील गाण्यांवर डान्स केला होता. सदस्य डान्स करताना खूप खूश दिसून येत होते.
बिग बॉसच्या घरात सदस्य त्यांना खटकणाऱ्या गोष्टी सगळ्यांपुढे न मांडता जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करत असतात. कालच्या भागात सुरेखा कुडची त्यांच्या मनातील एक महत्त्वाची गोष्ट स्नेहा आणि जयला सांगताना दिसून आल्या होत्या. सुरेखा ताई स्नेहा आणि जयला सांगणार होत्या, "जेवण बनवताना उत्कर्ष, गायत्री, मीरा, स्नेहा होती. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही ठरवून आम्हा चौघांना नॉमिनेट केले आहे.आम्ही तुमच्या दृष्टीने विक आहोत. टास्क आला की तुम्ही विचार करता की आम्ही टास्क खेळू शकत नाही. तुम्ही युक्ती वापरता पण त्या युक्तीचा वापर कधीच केला जात नाही. युक्तीपेक्षा शक्तीचाच वापर जास्त केला जातो. जिथे आम्ही कधीच कमी पडणार नाही. किचन एरियाला शून्य किंमत आहे. कितीही प्रेमाने करून घाला, जिवाचं रान करा त्याला किंमत नाही. त्याची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडू"