Kapil Sharma :  ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्माला (Kapil Sharma) कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याच्या कॉमिक टायमिंगपासून ते त्याच्या विनोदी शैलीपर्यंत, लोकांचे मनोरंजन करायला तो नेहमीच सज्ज असतो. आता पुन्हा एकदा कपिल शर्मा एका नवीन रुपात रसिकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. ‘I am not done yet’ या त्याच्या नव्या शोमध्ये प्रेक्षकांना त्याच्या आयुष्यातील ते किस्से ऐकायला मिळणार आहेत, जे आतापर्यंत कोणालाही माहित नव्हते.


कपिलने त्याचा वाईट काळही प्रेक्षकांसमोर अशा प्रकारे मांडला की, हे ऐकून प्रेक्षक पोट धरून हसायला लागले. कपिलला डिप्रेशन हा ब्रिटिशांचा आजार आहे, असे नेहमी वाटायचे. पण तो स्वतः डिप्रेशनचा बळी ठरल्यावर त्याने काय केले, माहितेय का?


नेटफ्लिक्सवरचा शो पहायचा!


ही त्या दिवसांची गोष्ट आहे, जेव्हा कपिल शर्माचा टीव्ही शो बंद झाला होता. अभिनेत्याने त्याच्या नैराश्याची कहाणी सांगितली आणि तो म्हणाला की, ‘जेव्हा माझा शो बंद झाला, तेव्हा मी मध्यरात्री दारू पिऊन वेळ घालवण्यासाठी नेटफ्लिक्सवर नार्कोस सिरीज पहायचो. त्यावेळी माझा कुत्रा जंजीरही माझ्यासोबत असायचा, तो माझी अवस्था पाहून गोंधळून जायचा. कारण मी नशेत पूर्ण एपिसोड बघायचो, मग सकाळी उठून तोचं शो पुन्हा बघायचो. कारण रात्रीचं काही आठवत नसायचं.’


कपिल शर्मा म्हणतो की, त्याला स्वतःला माहित नव्हते की, तो डिप्रेशनने ग्रस्त आहे. हा इंग्रजांचा आजार आहे असे त्याला वाटायचे. कपिल म्हणाला, आपल्या देशात डिप्रेशनबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. मी डिप्रेशनमध्ये आहे, हे मला वर्तमानपत्रात वाचून समजले. मी माझ्या मित्राला सांगितले की, मी डिप्रेशनमध्ये आहे, तर तो म्हणाला असे काही नसतेच, 2 पेग टाक सर्व काही निघून जाईल. पण कपिलने मित्राचे म्हणणे न ऐकता एका चांगल्या थेरपिस्टकडून उपचार करून घेतले आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha