Bigg Boss 15  : लवकरच ‘बिग बॉस 15’चा (Bigg Boss 15) विजेता जाहीर करण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी या शोचा ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे. हा भाग पाहताना बीबी चाहत्यांना खूप मजा येणार आहे. यावेळी फिनालेमध्येही चाहत्यांना वादावादी पाहायला मिळणार आहे.


आता फिनालेला कोण भांडतं? असा विचार तुम्हीही करत असाल. पण, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये शत्रुत्वच एवढं भयंकर असतं, तेव्हा कुठेही कधीही वाद होऊ शकतात.



तेजस्वी प्रकाशवर भडकला राकेश बापट


फिनालेच्या प्रोमोमध्ये तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. तेजस्वी करण कुंद्राबाबत (Karan Kundra) अनेकदा इन्सिक्युर होताना दिसली, त्यामुळे तिचे शमिता शेट्टीशी देखील भांडण झाले आहे. तेजस्वीचे आपल्या प्रेयसीसोबतचे असे वागणे राकेश बापट (Raqesh Bapat ) याला आवडले नाही. तो फिनालेला आला आणि त्याने तेजस्वी प्रकाशला चांगलेच बोल लगावले. राकेशने तेजस्वीळा स्पष्टपणे सांगितले की, शमिताला करण कुंद्रामध्ये काहीही रस नाही.


शमिताचा कथित प्रियकर राकेश बापट तेजस्वी प्रकाशवर निशाणा साधताना म्हणाला की, ‘तू हे सगळं का करत आहेस? शमिताला करण कुंद्रामध्ये अजिबात रस नाही. मला तर हे पाहून इतका राग आला होता की, मी टीव्ही फोडावा असा विचार करत होतो. ते अतिशय हास्यास्पद आहे.’ आपली बाजू मांडत तेजस्वी म्हणते की, ‘ही माझी तिच्या कृतीवरची प्रतिक्रिया आहे.’ या वादादरम्यान पुन्हा एकदा शमिता आणि तेजस्वीमध्ये भांडण जुंपते. ‘बिग बॉस’च्या फिनाले एपिसोडमध्ये दोन स्पर्धकांमध्ये वाद होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असणार आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha