मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं आहे. 'द कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचलेले बादशाहोचे कलाकार अजय देवगण, ईशा गुप्ता, इम्रान हाश्मी आणि इलियाना डिक्रूज यांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागली. परंतु बराच वेळ वाट पाहूनही कपिल न आल्याने या कलाकारांना रिकाम्या हाती परतावं लागलं.


सातत्याने चित्रीकरण रद्द करुन कपिल शर्मा बॉलिवूड कलाकारांसोबतचे संबंध बिघडवत आहे. बादशाहोची टीम परतल्यानंतर सनी देओल आणि बॉबी देओल हे सोमवारी 'पोस्टर बॉईज' सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार होते. परंतु कपिल शर्मा शूटिंग रद्द करेल की काय म्हणून त्यांनीच शोमध्ये न येण्याचा निर्णय घेतला.

कपिलला दारुचं व्यसन?
सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्माला दारुचं व्यसन लागलं आहे. तो लेट नाईट पार्टी करतो, त्यामुळे सकाळी वेळेवर उठत नाही. त्याला आरोग्याशी निगडित काही अडचणी आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणी आणखीच वाढत आहेत. सुनील ग्रोव्हरसोबत विमानात झालेलं भांडणही दारुच्या नशेतच झालं होतं.


...म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?


किती शोचं शूटिंग रद्द?
शूटिंग रद्द करण्याची सुरुवात 'जब हॅरी मेट सेजल'च्या प्रमोशनसाठी आलेल्या शाहरुख खान आणि अनुष्का शर्मापासून झाली. त्यानंतर 'मुबारकां'च्या प्रमोशनसाठी आलेल्या अर्जुन कपूर आणि अनिल कपूरसोबतही असंच काहीसं घडलं. 'गेस्ट इन लंडन'चं चित्रीकरणही तब्येतीच्या कारणामुळे रद्द केलं. परंतु नंतर अर्जुन आणि अनिल कपूर यांच्यासोबत पुन्हा शूटिंग केलं. मात्र शाहरुख अनुष्कासोबतच्या एपिसोडचं शूटिंग झालं नाही. याशिवाय कपिलने आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरला 5 तास वाट पाहायला लावलं होतं. श्रद्धाने निघून जाण्याची धमकी दिल्यानंतर तेव्हा कुठे कपिल शूटिंगसाठी आला.


'द कपिल शर्मा शो' बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?


...म्हणून चॅनलने करार वाढवला!
कपिल शर्माचा शोमधील रस कमी झाला आहे, असं म्हटलं जात आहे. चॅनल त्याच्यासोबतचा करार वाढवणार नाही, असं चर्चा होती. पण कपिलची लोकप्रियता पाहता चॅनलने त्याचा करार वाढवला.


कॉमेडी स्टार कपिल शर्मा नेत्रदान करणार!


कपिलला चॅनलची नोटीस
परंतु कपिलने मागच्या चुकांमधून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. आता संकटात सापडलेल्या चॅनलकडे टेलिकास्ट करण्यासाठी कोणताही एपिसोड नाही. एका वेबसाईटनुसार, चॅनलन कपिलला नोटीसही पाठवली आहे. कपिलने त्याची वागणूक सुधारावी अन्यथा परिणाम वाईट असू शकतील, असा इशारा त्याला देण्यात आला आहे.