मुंबई : छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट लवकरच कलर्स मालिकेवरील 'अधुरा अलविदा' या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच या सीरिअलचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले, जे पाहून जेनिफर या मालिकेत बोल्ड सीन करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.


सोनी टीव्हीवरील 'बेहद' या मालिकेत सायकोटिक प्रेयसीची व्यक्तिरेखा साकारणारी जेनिफर नव्या मालिकेत रोमँटिक भूमिका साकारणार आहे. मालिकेच्या नावाने बनवलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये जेनिफर आणि सेहबान अझीम इंटिमेट दिसत आहेत.

या मालिकेत जेनिफर विंगेटसह सेहबान अझीम आणि हर्षद चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. मालिकेची कहाणी अभिनेता राजेश खन्ना यांचा सुपरहिट चित्रपट 'कटी पतंग'वरुन घेतली आहे. जेनिफर एका विधवेच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे.

जेनिफर सध्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असून पहिल्यांदाच हर्षद चोप्रासह काम करत आहे. ऑक्टोबर महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

जेनिफर सध्या सोनी टीव्हीवरच्या 'बेहद' मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून तिच्यासोबत कुशाल टंडन मुख्य भूमिकेत आहे.