कपिल शर्माने खुल्लम खुल्ला गिन्नीवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. परंतु एका महिला क्रू मेंबरमुळे दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. या महिलेचं कपिल शर्मावर प्रेम होतं.
कपिल आणि गिन्नी यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. दोघे कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. कपिल शर्माने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन गिन्नीवर प्रचंड प्रेम असल्याचं सांगितलं होतं.
जालंधरची असलेल्या गिन्नीचं खरं नाव भवनीत चत्रार्थ आहे आणि ती कपिलसोबत 'हंस बलिये'मध्ये दिसली होती. कपिल 2014मध्ये तिच्यासोबत लग्नही करणार होता. यानंतर कपिल 'किस किस को प्यार करुं' या सिनेमात बिझी झाला आणि त्यांच्या लग्नाची चर्चा केवळ अफवा बनली.
याआधी कपिलचं नाव त्याच्या प्रॉडक्शन हाऊसची क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रीती सिमोससोबतही जोडलं होतं.
संबंधित बातम्या
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?
कॉमेडी स्टार कपिल शर्मा नेत्रदान करणार!
…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?
आता ‘द कपिल शर्मा शो’मधून नवज्योतसिंह सिद्धू बाहेर!