Lock Upp Finale : छोट्या पडद्यावरील लॉक अप (Lock Upp Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील स्पर्धक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्से प्रेक्षकांना सांगत आहेत. लॉक अपशोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) करते. या कार्यक्रामाचा ग्रँड फिनाले आज (7 मे) पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा विजेती कोण होणार आहे? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


लॉक अप या कार्यक्रमाच्या टॉप-7 स्पर्धकांमध्ये  मुनव्वर फारुकी, शिवम शर्मा, पायल रोहतगी, आजमा फल्लाह, प्रिंस नरूला, अंजली अरोरा, सायशा शिंदे हे स्पर्धक आहेत.  कंगनाच्या धाकड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बादशाह हा या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले तुम्ही ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयरवर 10:30 वाजता पाहू शकता. 


विजेत्याला मिळणार ट्रॉफी आणि 25 लाख 
लॉक-अप या कार्यक्रमाचा विजेता ठरलेल्या स्पर्धकाला  ट्रॉफी आणि 25 लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धक हे शोच्या सुरूवातीपासूनच या बक्षिसांसाठी एकमेकांसोबत स्पर्धा करत होते. 






लॉक-अप या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही 'क्वीन्स वॉर्डन' म्हणून सामील झाली आहे. तिच्याकडे 'क्वीन कार्ड' नावाचा विशेष अधिकार आहे. तर करण कुंद्रा हा या शोमध्ये वॉर्डन आहे. 


हेही वाचा :