वयाच्या अवघ्या तेवीसीतच जस्टिन बीबर पॉप जगतातला तारा बनला. मात्र प्रसिद्धीबरोबरच वादांची मालिकाही त्याच्या पाठिमागे कायम राहिली. सध्या जस्टिन बीबर चर्चेत आहे तो त्याच्या भारत दौऱ्यामुळे. मायकल जॅक्सननंतर आंतरष्ट्रीय पातळीवरचा एवढा मोठा स्टार जस्टिनच्या रुपानं भारतात येतोय.
म्हटलं जातंय की नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील मैदानावर होणारा जस्टिनचा शो एकाचवेळी 45 ते 50 हजार लोक पाहू शकणार आहेत. या कार्यक्रमासाठी 25 पोलीस अधिकारी, 500 पोलीस, 1200 खासगी सुरक्षारक्षकांचा फौजफाटाही तयार आहे.
महत्वाचं म्हणजे जस्टिनच्या सुरक्षेचा ताफा अधिक चोख ठेवण्याची जबाबदारी सलमान खानचा बॉडिगार्ड शेरावर सोपवली गेली आहे.
जस्टिनचा शो पाहण्यासाठी तिकिटांचा दर हा 4 हजारापासून ते तब्बल 77 हजार रुपये इतका आहे. मात्र, तरीही जस्टिनचं फॅन फॉलोईंग पाहता हा शो हाऊसफूल होईल, असा अंदाज आहे.
जस्टिनच्या शोला ‘हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड’ या सिनेमात झळकलेली अभिनेत्री एरिलिका जॉनसन होस्ट करणार आहे. एरिलिका जॉनसन स्वतःदेखील जस्टिन बीबर मोठी चाहती आहे.
1996 साली अशाच एका बड्या कलाकाराचा शो चर्चेत आणि वादात राहिला होता. तो स्टार म्हणजे मायकेल जॅक्सन. ज्यावेळी मायकेल जॅक्सन भारतात आला. त्यावेळी जस्टिन बीबर अवघ्या 2 वर्षांचा होता.
मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे त्याकाळात सत्तेत असलेल्या शिवसेनेचा पुढाकार होता. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी स्थापन झालेल्या शिवउद्योग सेनेकडे होती. आणि मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामागे खुद्द राज ठाकरेंचा मोठा हात होता.
मायकेल जॅक्सन जेव्हा मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित राहिले होते. खास मराठमोळ्या पद्धतीनं झालेल्या स्वागतामुळे मायकेल जॅक्सन भारावल्याची दृश्यं आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत. विमानतळावरच्या स्वागतानंतर मायकेल जॅक्सननं बाळासाहेब ठाकरेंची राहत्या घरी भेटली. त्यानंतर भारताबद्दलच्या अनेक आठवणी मायकेल जॅक्सननं लिहून ठेवल्या होत्या.
या दोन स्टार्सची तुलना यासाठी की दोघंही नेहमी वादात राहिले. मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामागे एका राजकीय पक्षाचा पुढाकार होता. म्हणून त्याकाळी प्रचंड टीकाही झाली. आता जस्टिननंही भारतात येण्यासाठी आयोजकांपुढे काही हास्यास्पद तर काही अशक्यप्राय अटी पुढे ठेवण्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.
संबंधित बातम्या
जस्टिन बिबर मुंबईत दाखल, कॉन्सर्टसाठी चाहत्यांची झुंबड
सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड!
2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी