नवी दिल्ली : पिझ्झा, बर्गर, कोल्डड्रिंक्सच्या जाहिराती यापुढे कार्टून चॅनलवर दिसणार नाहीत. सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. कोका कोला, नेस्लेसह नऊ कंपन्यांनी सरकारला तसं आश्वासन दिल्याचंही राठोड यांनी सांगितलं.


सध्या अशा जाहिरातींवर बंदी घालण्याचा कुठलाही कायदा नाही. पण नऊ कंपन्यांनी कार्टून चॅनलवर जंक फूडच्या जाहिराती न दाखविण्याचं आश्वास दिलं आहे.

खासदार विनायक राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ही माहिती दिली. अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण  (FSSAI)ने 11 सदस्यीय समिती गठित केली असून सध्या या समितीच्या रिपोर्टवर अंमलबजावणी सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.