Julun Yeti Reshimgathi: छोट्या पडद्यावरील मालिका अनेक प्रेक्षक दररोज आवडीनं बघतात. मराठी मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते.  'जुळून येती रेशीमगाठी' (Julun Yeti Reshimgathi) या मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. याचनिमित्तानं अभिनेता   ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.


ललित आणि प्राजक्ताची खास पोस्ट


'जुळून येती रेशीमगाठी'  या मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्राजक्ता आणि ललित यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता आणि ललित यांचे काही खास फोटो दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, काढायचा का दुसरा भाग ? जुळून येती रेशीमगाठी (नाम तो सुना होगा). या मालिकेला दहा वर्ष पूर्ण होत आहेत."


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


प्राजक्ता आणि ललित यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "दुसरा भाग आला तर अर्थात खूप छान वाटेल आणि जून्या आठवणी ताज्या होणार. सर्वात महत्वाचं मालिकेचं टायटल साँग, ते अगदी छान होतं." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "दुसरा भाग हवाच, पण सगळे तेच कलाकार हवे."






'जुळून येती रेशीमगाठी' ची स्टार कास्ट


आदित्य देसाई आणि मेघना कुडाळकर यांची गोष्ट दाखवण्यात आली. यामधील आदित्य ही भूमिका ललितनं साकारली तर मेघना ही भूमिका प्राजक्तानं साकारली. या मालिकेत गिरीश ओक, सुकन्या मोने,मधुगंधा कुलकर्णी , लोकेश गुप्ते ,उदय टिकेकर  यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली. 'जुळून येती रेशीमगाठी'  या मालिकेच्या टायटल साँगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेचं टायटल साँग स्वप्नील बांदोडकरनं गायलं आहे. 2013 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. जवळपास दोन वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Marathi Serial: वादळवाट ते उंच माझा झोका; 'या' मराठी मालिकांचे टायटल साँग्स आजही आवडीने ऐकले जातात