करण-बिपाशाच्या लग्नाबाबत जेनिफर म्हणाली...
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2016 06:05 AM (IST)
मुंबई : टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने पहिला पती करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांच्या लग्नाबाबत अखेर मौन सोडलं आहे. एका इंग्लिश वृत्तपत्राशी बोलताना जेनिफर म्हणाली की, "करण आणि बिपाशासाठी मी आनंदी आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही अढी नाही. बिपाशा आणि करण यांना माझ्याकडून शुभेच्छा. दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसते."