मला मलायका अरोरा खूप आवडते : करण जोहर
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2016 01:04 PM (IST)
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्यात वितुष्ट आल्यानंतर बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने मलायकाबाबतचा हळवा कोपरा खुला केला आहे. मला मलायका अरोरा बाबत लालसा (lust) वाटते, असं करणने सांगितलं. इंडियाज गॉट टॅलेंटच्या नव्या पर्वाच्या निमित्ताने करण आणि मलायक एकत्र परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. यावेळी हसत खेळत झालेल्या गप्पांच्या दरम्यान करणने आपल्या भावना व्यक्त केल्या. 'मलायकाला पाहून कोणाच्याही मनात लालसा निर्माण होईल, हे तर तुम्हाला माहितच आहे. माझ्याही मनात तिच्याबद्दल लालसा आहे' असं करण म्हणाला. 'इथे मी मुन्ना आहे (मुन्नी बदनाम गाण्यावरुन कोटी) आणि मी बदनाम व्हायला तयार आहे' अशी कोपरखळीही त्याने मारली. यावर उत्तर देताना आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल 'तशा' भावना वाटतात, आणि हा सर्वांना माहित असलेला खुलासा आहे, असं मलायका म्हणाली.