कपिलची बायको साकारणारी सुमोना चक्रवर्ती कार्यक्रमातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना मध्यंतरीच्या काळात उत आला होता. त्यानंतर आता नोकरही कार्यक्रमातून एक्झिट घेण्याचे संकेत आहेत. चंदन आणि कपिल हे ऑफस्क्रीनही खूप चांगले मित्र आहेत. चंदन एकता कपूरच्या आगामी 'इंडियन मझाक लीग'मध्ये दिसणार आहे. मात्र सोनी टीव्हीच्या प्रतिस्पर्धी वाहिनीवर ही मालिका येत असल्याने चंदन शो सोडू शकतो.

चंदनने मात्र या चर्चांना पूर्णविराम देत कपिल शर्मा शो सोडण्याचा तूर्तास कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'कपिलला मी दुसरा शो करत असल्याने कोणताही प्रॉब्लेम नाही. जर दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी ऑन एअर जात असतील, तर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र कपिलचा शो माझ्या मनाच्या जवळचा असल्याने तो सोडण्याची कुठलीही शक्यता नाही.' असं चंदनने म्हटलं आहे.