Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेतील आजचा भाग खूपच रोमॅंटिक असणार आहे. कालच्या भागात यश नेहाला डिनरडेटवर घेऊन गेलेला दिसला. आजच्या भागात यश नेहाला पुन्हा एकदा रोमॅंटिक अंदाजात प्रपोज करणार आहे. 


मराठी मालिकांमध्ये बऱ्याच बॉलिवूड सिनेमांचे सीन रिक्रिएट केले जात आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत सध्या सुरू असलेला रोमॅंटिक सीन शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' या सिनेमातून घेण्यात आला आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा श्रेयस तळपदेदेखील 'ओम शांती ओम' सिनेमात दिसला होता.





मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये यश आणि नेहाचे सुंदर रोमॅंटिक क्षण दाखवण्यात आले आहेत. यश-नेहाची पहिली-वहिली डिनटडेट नक्कीच खास असणार आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 


संबंधित बातम्या


Sukh Mhanje Nakki Kay Asta : गौरीसारखी नव्हे तर ती गौरीच! माईंसमोर होणार जयदीप-मानसीच्या कृत्याचा उलगडा!


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत इंद्रा दिपूला सांगणार सानिकाच्या लग्नामागचं सत्य


Jhund Box Office Collection Day 1: नागराज मंजुळेंच्या 'झुंड'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha