Yetoy To Khatoy : अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) 'येतोय तो खातोय' (Yetoy to Khatoy) या नव्या नाटकाच्या (Marathi Natak) माध्यमातून रंगभूमीवर येत आहेत. या नाटकाच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय विसंगतीवर भाष्य करण्यात येणार आहे. 


तगडी स्टारकास्ट असलेलं 'येतोय तो खातोय' 


'येतोय तो खातोय' (Yetoy to Khatoy Marathi Natak) या नाटकाचं लेखन विजय कुवळेकर यांनी केलं असून या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा हृषिकेश जोशी यांनी सांभाळली आहे. संतोष पवार (Santosh Pawar), स्वप्नील राजशेखर, भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule), अधोक्षज कऱ्हाडे (Adhokshaj Karhade),  मयुरा रानडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वाबुंरकर आणि हृषिकेश जोशी हे कलाकार या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या नव्या नाटकाची नाट्यरसिकांना उत्सुकता आहे. 


'येतोय तो खातोय' या नाटकात काय पाहायला मिळणार? 


'येतोय तो खातोय' या नाटकाच्या माध्यमातून, सहा दमदार गाण्यांच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय विसंगतीवर भाष्य करणार येणार आहे. राजकारणातल्या डावपेचांचा उपरोधिक समाचार घेताना गोष्टीच्या माध्यमातून राजकीय हेवेदावे विनोदी पद्धतीने आणि तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारं हे नाटक नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. 


हृषिकेश जोशी 'येतोय तो खातोय' या नाटकाबद्दल बोलताना म्हणाले,"सध्याचं राजकारण आकलनापलीकडेच आहे. 'येतोय तो खातोय' या नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनासह 'राजकीय पोलखोल' केली जाणार आहे. ही पोलखोल करताना कोणाचीही राजकीय बाजू घेण्याचा व कोणाचाही राजकीय विरोध करण्याचा प्रयत्न या नाटकात नसणार आहे".


हृषिकेश जोशी यांनी शेअर केला व्हिडीओ (Hrishikesh Joshi Shared Video)


हृषिकेश जोशी यांनी 'येतोय तो खातोय' या नाटकाच्या तालमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"तर मंडळी... विजय कुवळेकर लिखित, हृषिकेश जोशी दिग्दर्शित एक हसतं...खेळतं...गातं...नाचतं... 'मुक्तनाट्य' आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. लवकरच प्रयोगाच्या तारखा लवकरच जाहीर करू". 






संबंधित बातम्या


Chhupe Rustam : रंगभूमीवर नव्या नाटकाची नांदी, ‘छुपे रुस्तम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी!