Maha Minister : छोट्या पडद्यावरील 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाने आता अठरा वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर घराघरांत पोहोचले आहे. आता लवकरच होम मिनिस्टरचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं नाव 'महामिनिस्टर' (Maha Minister) असं असणार आहे. 


'होम मिनिस्टर' या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्रातील वहिनींचे लाडके भावजी ठरले आहेत. आता आदेश बांदेकर 'महामिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महापर्वाची विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील वहिनींना 11 लाखांची पैठणी जिंकता येणार आहे. 


'महामिनिस्टर'चा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये आदेश बांदेकरांवर त्यांच्या आयुष्यातील होम मिनिस्टर चिडलेल्या दिसत आहेत. 'महामिनिस्टर' हा नवा कार्यक्रम 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षक आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.





या पर्वात महामिनिस्टरच्या शोधात आदेश भावजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ खेळणार आहे. विजेत्या वहिनींना महामिनिस्टरचा खिताब आणि 11 लाखांची सोन्याची जरी असलेली पैठणी मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Amey Wagh : 'माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत… त्यांना आरसा...' अमेय वाघची पोस्ट चर्चेत


Padma Awards 2022: पद्म पुरस्कार प्रदान सोहळा, गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण,तर सुलोचनादीदींचा ‘पद्मश्री’ने सन्मान!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha