बिकानेर : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील मोठमोठ तारे दिसले आहेत. पण काही स्टार्स असेही आहेत, ज्यांना कपिल शर्माने अनेक वेळा त्याच्या शोमध्ये आणण्याचे प्रयत्न केले आहेत. पण कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्यांनी कपिलला नकार दिला आहे.
या कलाकारांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश आहे.
पण कपिल शर्माने अशाच एका रहस्यावरुन पडदा उठवला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये अखेर का आलेला नाही, याचा उलगडा स्वत: कपिलने केला आहे.
कपिल म्हणाला की, जे लोक चांगली कामं करतात, ज्यांचं आयुष्य प्रेरणादायी आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला मला माझ्या शोमध्ये आमंत्रित करायचं असतं. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर हे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. ते माझा शो पाहतात. पण मी त्यांना शोमध्ये येण्याचं आमंत्रण देतो, तेव्हा आम्ही शोमध्ये येऊन काय बोलणार, असं उत्तर ते देतात.
लतादीदींनी मला एक घड्याळ भेट म्हणून दिलं आहे, जे मी सांभाळून ठेवलं आहे. माझ्या शोमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन आले होते, तो अतिशय शानदार क्षण होता, असं कपिल शर्मा म्हणाला.