Hemangi Kavi :

  अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi)  ही सध्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava)  या मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत ती अॅडव्होकेट गायत्री वर्तक ही भूमिका साकारत आहे. हेमांगीनं या भूमिकेबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


हेमांगीनं ‘मन धागा धागा जोडते नवा’  या मालिकेतील तिच्या भूमिकेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'See you in Court! माझे बाबा एलएलबी(वकिल) होते पण घरच्या परिस्तिथीमुळे प्रॅक्टिस न करता त्यांना नोकरी धरावी लागली. पण त्यांचा हा वकिलीचा अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी उपयोगात आणला किंवा असं म्हणूया तो नकळतपणे येत होता. कंपनीच्या संपाच्या वेळेस, कंपनीच्या Union मध्ये, कधी कधी तर वैयक्तिक समस्या घेऊन बरेच लोक त्यांच्याकडे कायदेशीर सल्ले मागायला यायचे आणि माझे ‘पप्पा’ जणू त्यांच्याकडे आलेल्या एखाद्या professional case सारखी त्यांच्या मित्रांना, कामगारांना, ओळखीच्या लोकांना विना मुल्य मदत करायचे. त्यावर माझी ‘मम्मी’ typical बायको सारखी कायम बोलायची, “या मदतीचे किमान पैसे तरी घ्या, का उगा लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?” त्यावर ते वकिली उत्तर देत म्हणायचे “वकिलीची शपथ घेतली नाही तर मी कुणाकडून पैसे कसे घेणार? मी जर असे पैसे घेतले तर माझ्यावरच केस होईल. नाही का?” त्यावर बिच्चारी माझी मम्मी case मध्ये हरलेल्या client सारखी गप्प व्हायची. आम्ही भावंडं भांडायला लागलो की माझं मुद्देसुद बोलणं ऐकून माझी आई नेहमी म्हणायची rather अजूनही म्हणते वकिलाची मुलगी शोभतेस खरी!'


पुढे तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सध्या मी STAR Pravah च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत एका वकिलाची भूमिका साकारतेय. माझ्या बाबांनी कधीच आमच्यावर त्यांचा वकिलीचा वारसा जपण्याची इच्छा लादली नाही! उलट आम्हांला जे आवडेल, झेपेल तेच शिकू दिलं! आवडतं क्षेत्र निवडू दिलं! पण आज मला असं वकिलाच्या Band आणि Gown मध्ये पाहून त्यांना खूप खूप आनंद झाला असता हे नक्की! माझ्या Acting Career चा महत्त्वाचा खांब असणाऱ्या माझ्या ‘पप्पांना’ माझ्या सर्व भूमिका समर्पित आहेतच पण Advocate Gayatri Vartak ही भूमिका खास तुमच्यासाठी पप्पा!'




हेमांगी 'लेक माझी दुर्गा' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच ती 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हेमांगी ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Hemangi Kavi : हेमांगी कवीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष; म्हणाली, 'आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली आहे.'