Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.  हेमांगीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. हेमांगी वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं सोशल मीडियावर बिनधास्तपणे मांडत असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हेमांगीनं तिचे बालपण आणि तिचे आई-बाबा या विषयांवर चर्चा केली. 


हेमांगीनं एका पॉडकास्टमध्ये तिच्या बालपणाबद्दल सांगितलं. 'तुझ्यात हा फिअरलेस अप्रोच कसा आला?' असा प्रश्न हेमांगीला या पॉडकास्टमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत हेमांगी म्हणाली, 'बोल्ड, निर्भीड, बिनधास्त असं मला कोणी म्हटलं की, मला आश्चर्य वाटतं. मी जे बोलते त्या गोष्टी बोलायलाच पाहिजेत. मी निर्भीड असण्यामागील कारण म्हणजे माझे बाबा. माझ्या बाबांनी माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये Gender Difference  कधीच केला नाही.'


पुढे हेमांगी म्हणाली, 'टायटॅनिक, दयावान यांसारखे सिनेमे आम्ही एकत्र बसून बघितले आहेत. माझी आई सातवी पास, माझे बाबा एलएलबी होते. वन रुम किचनमध्ये आम्ही राहात होतो. आई आणि बाबांची प्रायव्हसी आम्ही पाहिलेली आहे. एकदा माझ्या ताईला मी प्रश्न विचारला की, आई-बाबा काय करत होते? तेव्हा ताईनं माझ्यासोबत त्या विषयांवर चर्चा केली होती.'






 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट हेमांगीनं काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केली होती. तिच्या या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर झाली. या पोस्टमध्ये तिनं ब्रा वापरण्याबाबत लिहिलं होतं. ' Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी!' असं या पोस्टमध्ये हेमांगीनं लिहिलं होतं.


हेमांगीची पोस्ट



हेमांगी 'लेक माझी दुर्गा' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच ती 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हेमांगी तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.  तमाशा Live या चित्रपटामध्ये देखील हेमांगीनं काम केलं.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Hemangi Kavi : 'वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा...'; हेमांगीची पोस्ट पुन्हा चर्चेत