Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Latest News: तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)मालिका सुरू होऊन आता 13 वर्षं झाली आहेत. एका दशकापेक्षा जास्त वर्ष होऊन गेली असली तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची आहे. या 13 वर्षांत अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे तर काही नव्या कलाकारांचे आगमन झाले आहे. मालिका सोडलेल्या कलाकारांच्या यादीत गुरुचरण सिंह म्हणजेच जुना सोढी आहे. त्याने 2020 मध्ये हा कार्यक्रम करण्यास नकार दिला होता.
या कारणाने सोडली मालिका
2020 सालात लॉकडाऊन नंतर जेव्हा शूटिंग सुरू होऊन मालिका सुरू झाली त्यावेळी दोन कलाकारांनी मालिका करण्यास नकार दिला होता. त्यातील एक नाव म्हणजे गुरुचरण सिंह. मालिकेचा प्रवास सुरू झाल्यापासून तो सोढीचे पात्र साकारत होता. त्याने साकरलेले पात्र चाहत्यांच्या पसंतीस पडत होते. मालिका सोडल्यानंतर एक वर्षाने सोढीने मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे. त्यावेळेस त्याच्या वडिलांची सर्जरी होती. त्यांना त्याची गरज होती. त्यामुळे त्याने मालिका सोडण्याचे ठरवले.
मालिकेत परत एन्ट्री करण्यासंदर्भात सोढी म्हणतो मालिकेत परत कधी दिसणार यावर सोढी म्हणाला, मी मालिकेत काम करण्यासाठी तयार आहे. देवाच्या मनात असेल तर मी नक्की मालिकेत दिसेल. सध्या मालिकेत सोढीचे पात्र बलविंदर सिंह साकारत आहे.
"तारक मेहता का उल्टा चश्मा" मालिकेतील नट्टू काकांचे झाले निधन
नट्टू काका घशाच्या कॅन्सरने पीडित होते. मागील वर्षी त्यांचे त्यासाठी ऑपरेशनदेखील झाले होते. पण त्यांना कॅन्सरच्या आजारातून बाहेर यश आले नाही. त्यांचे मुंबईतल्या मालाडमधील एका रुग्णालयात निधन झाले.
नट्टू काकांच्या निधनानंतर पंतप्रधानांनी केला होता शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटले आहे की, "मागील काही दिवसांत आपण अभिनयातील दिग्गज कलाकार गमावले. घनश्याम नायक 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील त्यांच्या भूमिकेमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील. अभिनेता असूनही अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं."