Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरातून दर आठवड्याला एका स्पर्धकाला बाहेर जावे लागत असते. काल सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, दादुस, तृप्ती ताई शो मधून अक्षयला बाहेर जावे लागले. अक्षय घरात सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा, सगळ्यांना समजून घेणारा, कोणासोबत वाद न घालणारा होता. त्यामुळे तो बाहेर पडल्याने घरातील प्रत्येक सदस्याला अश्रू अनावर झाले होते. अक्षयला मांजरेकरांनी घरातल्या अनुभवाबद्दल विचारले तेव्हा अक्षय म्हणाला, "या घरात राहणे खूप कठीण आहे. मी टास्क खेळलो तेव्हा जीव ओतून खेळत होतो." बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडणारा अक्षय वाघमारे पहिला सदस्य ठरला आहे. 


बिग बॉस मराठीच्या घरातून काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका नवा सदस्याची घरात एंट्री झाली आहे. काल बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. आज बिग बॉसच्या घरात आदिश वैद्य जाणार आहे. तो घरात जाणार त्या आधीच बिग बॉसने त्याला एक कठीण कार्य सोपवले आहे. बिग बॉसने आदिशला पॉवर कार्ड दिले आहे. या पॉवर कार्डद्वारे घरातील कोणता सदस्य कोणते काम करणार याची विभागणी करण्याचा अधिकार आदिशकडे असणार आहे. तसेच बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. 


बिग बॉस मराठीच्या घरात नेहमीच वेगवेगळे टास्क होत असतात. घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद-विवाद, भांडण, मैत्री हे सगळेच चर्चेचे विषय ठरतात. सदस्य कोणताही मुखवटा न बाळगता बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता घरात आदिशमुळे रंजक वळण आले आहे. त्यामुळे घरातील नाती त्याच्या एन्ट्रीमुळे बदलणार का? घरातील कोणत्या गटाचा आदिश भाग होणार? की आदिश त्याचा नवा गट तयार करणार हे ? आदिश त्याचा स्वत:चा स्वतंत्र खेळ स्वतंत्रपणे खेळेल का? घरातील सदस्य आदिशचे स्वागत कशापद्धतीने करणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 


बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक, दादुसचा दिलखुलास अंदाज, घरात असणारे A,B,C असे तीन गट, विशाल विकासची मैत्री, जयचा बेधडक अंदाज, मीनलची बडबड, सदस्यांची टास्क जिंकण्याची जिद्द, महेश मांजरेकर यांची बिग बॉसची चावडी असे अनेक विषय नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. 


घरात जाणाऱ्या आदिश म्हणतो, मी घरात जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. माझा आवडता सदस्य विकास पाटील आहे. जय, विशाल आणि मीनल हे तीन सदस्य मला माझे स्ट्राँग प्रतिस्पर्धी वाटतात. वाईल्ड कार्डद्वारे घरात गेलेले स्पर्धक कधी जिंकले नाहीत. पण मी घरामध्ये लवकर जात आहे तर ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विजेता म्हणून बाहेर यायला मला आवडेल". 


बिग बॉसच्या घरातील सदस्य अनेकदा भावुक होत असतात. कधी दुसऱ्यांच्या वाईट बोलण्याने तर कधी घरच्यांच्या आठवणीने, तर कधी जवळच्या सदस्याच्या वागणुकीमुळे. आजच्या भागात मीनलच्या वागणूकीमुळे सोनाली आणि विकास दुखावलेले पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सोनाली विशालसमोर मन मोकळं करताना दिसून येणार आहे.