मुंबई: ‘मल्लिका ए गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेगम अख्तर यांना जयंती दिनी गुगलने डूडलद्वारे सलामी दिली आहे.
‘ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया.’, हम नफस, मरे नवा, मुझे दोस्त बन के दगा न दे' यासारख्या अजरामर गझल देणाऱ्या बेगम अख्तर यांची आज 103 वी जयंती आहे. त्याच निमित्ताने गुगलने भारताच्या या गजलसम्राज्ञीचं डूडल बनवलं आहे.
बेगम अख्तर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1914 रोजी झाला. गझल, दादरा आणि ठुमरी या भारतीय संगीतात त्यांचा हातखंडा होता.
आपल्या गाण्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. पाकिस्तानमध्येही त्यांचे अनेक चाहते आहेत.
बेगम अख्तर यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. याशिवाय त्यांनी संगीत क्षेत्रातील मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कारही पटकावला होता.
बेगम अख्तर यांनी पहिल्यांदा कोलकाता इथं स्टेजवर आपलं गाणं सादर केलं होतं. बिहारच्या भूकंप पीडितांसाठी हा कार्यक्रम होता.
बेगम अख्तर यांच्या टॉप टेन गझल
1. ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया : गझल, (शकील बदायुंनी) क्लिक करा)
2. उल्टी हो गयी सब तदबीरें : गझल, (मीर तकी मीर) क्लिक करा)
3. जिक्र उस परीवश का : गझल, (मिर्ज़ा ग़ालिब) क्लिक करा)
4. कुछ तो दुनिया की इनायात ने दिल तोड़ दिया : गझल (सुदर्शन फाकिर) क्लिक करा)
5. अहले उल्फ़त के हवालों पे हँसी आती है : गझल (सुदर्शन फाकिर) क्लिक करा)
6. वो जो हम में तुम में करार था : गझल (मोमिन) क्लिक करा)
7. शाम-ए-फिराक अब न पूछ : गझल (फैजअहमद फैज) क्लिक करा)
8. इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे : गझल (कैफी आजमी) क्लिक करा)
9. जिंदगी का दर्द लेकर इंकलाब आया तो क्या : गझल (शकील बदायुंनी) (ऐकण्यासाठी क्लिक करा)
10. दीवाना बनाना है तो दीवाना बना दे : गझल (बेहजाद लखनवी) क्लिक करा)