Rekha Fees For Shot In Ghum Hai Kisikey Pyaar Meiin : 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेतील विराट आणि सईचा ट्रॅक संपणार आहे. आता ही मालिका 20 वर्षांचा लीक घेणार असून मालिकेत पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) दिसणार आहेत.
'गुम है किसी के प्यार में' मालिकेचा प्रोमो शूट करण्यासाठी रेखा यांनी किती मानधन घेतलं?
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेचा टीआरपी घसरल्याने निर्मात्यांनी रेखा यांना विचारणा केली. नुकतच त्यांनी या मालिकेचा प्रोमो शूट केला आहे. मुंबईमधील एका हॉटेलमध्ये हा प्रोमो शूट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रेखा नव्या पिढीची ओळख करुन देताना दिसणार आहेत. दीड मिनिटांच्या या प्रोमोसाठी रेखा यांनी तब्बल 10 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
रेखा यांना पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत रेखा यांनी याआधीदेखील काम केलं होतं. 2020 मधील एका भागात त्या दिसून आल्या होत्या. रेखा यांनी याआधी जेव्हा 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेचा प्रोमो शूट केला होता. त्यावेळीदेखील त्यांनी पाच-सात कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. या प्रोमोमध्ये त्या मालिकेच्या नव्या कथानकाबद्दल बोलताना दिसणार आहेत. त्यामुळे रेखा यांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अद्याप त्या या मालिकेत नक्की कोणती भूमिका साकारणार हे समोर आलेलं नाही.
'गुम है किसी की प्यार में' या मालिकेत सध्या सई सत्याला घेऊन जर्मनीला जात आहे. त्यावेळी विराट त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. तसेच सई वीणूला भेटण्यासाठी सत्या आणि सवीसोबत चव्हाण हाऊसमध्ये जाते. आता 'गुम है किसी के प्यार में' मालिकेच्या आगामी भागात आयशा सिंह, नील भट्ट हे कलाकार दिसणार नाहीत, असे म्हटले जात आहे.
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत आयशा सिंह, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.ऐश्वर्याने आता या मालिकेतून निरोप घेतला असून आता ती रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग करत आहे. तर नील आणि आयशाचेदेखील अनेक प्रोजेक्ट पाइपलाईनमध्ये आहेत.
संबंधित बातम्या