Gharoghari Matichya Chuli : 18 मार्चपासून, 'स्टार प्रवाह'वर 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) ही मालिका सुरू झाली. नव्या मालिकेच्या पहिल्या एपिसोडवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. मात्र, या मालिकेच्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रोमोमध्ये नोकरी सोडून फक्त घर सांभाळणाऱ्या मुलीच योग्य असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आक्षेप प्रेक्षकांनी घेतला आहे.
काय आहे नवा प्रोमो?
'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेच्या प्रोमोमध्ये जानकी आपल्या मुलीला गोष्ट सांगत असते. जानकी मुलीला सांगते की, देव बाप्पाने एका मुलीच्या आयुष्यात एका मुलाला पाठवले. लग्न करून बायको म्हणून घरी आली. जानकी हे सांगत असतानाच तिची सासू अर्थात सविता प्रभुणे या मोठ्या पगाराच्या नोकरीची पर्वा न करता तिने गृहिणी म्हणून होण्याचे ठरवले. या तिच्या त्यागाचं तिच्या सासूसासऱ्यांना खूप कौतुक आहे.' त्यावर जानकी म्हणते, 'त्याग नाही निवड.'
नव्या प्रोमोवर प्रेक्षक संतापले
एका प्रेक्षकाने म्हटले की, हे 2024 आहे. आता बायका घर आणि करिअर दोन्ही उत्तम सांभाळतात. ही मुख्य अभिनेत्री काय आदर्श ठेवणार? हिच्यामध्ये क्षमता नाही म्हणून घरी बसली. 22 वर्षापूर्वींची कालबाह्य संकल्पना आणली तर मुख्य अभिनेत्री असलेच उपदेश करणार असेही त्याने म्हटले.
नोकरी सोडून घर सांभाळते आहे म्हणून अभिमान आहे... आणि नसती नोकरी सोडली असती तर काय असा प्रश्नही एकाने उपस्थित केला.
एका महिला प्रेक्षकाने म्हटले की, नोकरी सोडून त्याग केला काय? मग ज्या नोकरी करतात त्या स्वार्थी आहेत का आणि हे असले उपदेशाचे डोस पाजणं तेव्हाच सोपं असते जेव्हा नवरा पैसेवाला असतो. हेच वाक्य अठराविश्वे दारिद्र्य असणाऱ्यांच्या घरी बोला, अशी संतप्त प्रतिक्रिया एका महिला प्रेक्षकाने दिली.
एका प्रेक्षकाने असल्याच गोष्टी तुम्ही प्रमोट करा, नोकरी सोडून घर सांभाळणे
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत 'स्टार प्रवाह'ने दमदार कलाकारांची फौज उतरवली आहे. त्यामुळे या मालिकेची मोठी चर्चा सुरू झाली होती. या मालिकेसाठी 'आई कुठे काय करते' या मालिकेची वेळ बदलण्यात आली.
या मालिकेत तगडी स्टार कास्ट आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. आरोही सांबरे ही बालकलाकारही झळकणार आहे. सविता प्रभुणे, सुमित पुसावळे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, भक्ती देसाई, सुनील गोडसे आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.