1. मोठे कलाकार छोट्या पडद्यावर : सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, पल्लवी जोशी, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, सई ताम्हणकर, सचित पाटील यासारख्या चित्रपटात भूमिका करणाऱ्या कलाकारांनी छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. कोणी रिअॅलिटी शोमध्ये झळकलं, तर कोणी मालिकांमध्ये.
2. बिग बॉसची मराठीत एन्ट्री : जगभरात धुमाकूळ घालणारा बिग बॉस हा आगळा वेगळा रिअॅलिटी शो मराठीमध्ये अवतरला. मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली, तरी सई, पुष्कर, आस्ताद, रेशम, स्मिता अशा अनेकांनी हा शो गाजवला.
3. सूर नवा ध्यास नवा : सूर नवा ध्यास नवा या रिअॅलिटी शोने नवा इतिहास रचला. या शोच्या पहिल्या पर्वाचा ग्रँड फिनाले वर्षाच्या पूर्वार्धात झाला, तर छोटे सूरवीर या दुसऱ्या पर्वातील उस्ताद धुमाकूळ घालत आहेत.
4. चला हवा येऊ द्या : चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोला पुन्हा नव्याने सूर गवसला. विश्व दौऱ्यात या कार्यक्रमाचा दर्जा घसरल्याची टीका झाली होती. मात्र नव्या सिझनमध्ये जोशाने हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
5. क्राईम शोची चलती : प्रेमा तुझा रंग कसा? या क्राईम शोने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. याचे दोन सीझन संपल्यानंतर पुन्हा स्पेशल 5 हा क्राईम शो आला. तर कलर्सवरही लवकरच एक क्राईम शो येत आहे.
6. सोनी मराठीचं आगमन : झी मराठी, झी युवा, कलर्स मराठी, स्टार प्रवाह या प्रमुख वाहिन्यांना टक्कर देण्यासाठी सोनी मराठी ही नवीन वाहिनी मैदानात उतरली. ही वाहिनी हे आव्हान चांगल्या पद्धतीने पेलताना दिसत आहे.
7. सास-बहूला छुट्टी : तुझ्यात जीव रंगला, लागिरं झालं जी, संभाजी, तुला पाहते रे, सारे तुझ्याचसाठी, फुलराणी, फुलपाखरु यासारख्या अनेक मालिकांतून टिपीकल सास-बहू विषयांना फाटा देण्यात आला.
8. गूढ मालिका : रात्रीस खेळ चाले नंतर झी मराठीवर ग्रहण ही मालिका दाखल झाली. वेगळं वळण देण्याच्या नादात ही मालिका सपशेल आपटली. मात्र त्यानंतर वर्तुळ ही सस्पेन्स आधारित मालिका झी युवावर सुरु झाली.
9. विनोदाचं भरीत : चला हवा येऊ द्या प्रमाणेच तुमच्यासाठी काय पण, महाराष्ट्राची हास्यजत्रा हे शो मराठीत झळकले. त्याशिवाय जागो मोहन प्यारे, गाव गाता गजाली 2, हम तो तेरे आशिक है, ह.म. बने तु.म. बने यासारख्या मालिका गाजत आहेत.
10. प्रेमाचा त्रिकोण : प्रेमाचा त्रिकोण हा टीव्ही मालिकांमधील सर्वात आवडता विषय. माझ्या नवऱ्याची बायको, तुझं माझं ब्रेक अप, घाडगे अँड सून, राधा प्रेम रंगी रंगली, लक्ष्मी सदैव मंगलम् यासारख्या सर्वस्वी या विषयाला वाहिलेल्या मालिकाही झळकल्या.
संबंधित फीचर्स :