Sa Re Ga Ma Pa Li'l Champs Winner:  'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023' (Sa Re Ga Ma Pa Li'l Champs 2023)  या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले काल (25 नोव्हेंबर) पार पडला. या सोहळ्यात विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोपरगावची गौरी अलका पगारे (Gauri Alka Pagare) ही 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023'  या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे. एकूण सहा स्पर्धक 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023'   च्या फिनालेपर्यंत पोहोचले होते ज्यामधील गौरीनं 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023'  या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.


'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023' चे टॉप 6 स्पर्धक


श्रावणी वागळे, हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, देवांश भाटे, गीत बागडे आणि गौरी अलका पगारे या सहा स्पर्धकांनी तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023 मराठी' च्या अंतिम फेरीत एन्ट्री केली. यामधील  श्रावणी वागळे आणि जयेश खरे  हे दोन  हे स्पर्धक उपविजेते ठरले. तर गौरी ही विजेती ठरली.
गौरीनं तिच्या सुरेल आवाजाने आणि गायनाच्या शैलीने केवळ परीक्षकांची नाही तर प्रेक्षकांची देखील मनं जिंकली. 


गौरीवर बक्षिसांचा पाऊस


'सा रे ग म प लिल चॅम्प्स 2023' कार्यक्रमाची विजेती गौरी पगारेला मंगेशकर  कुटुंबीयांनी ट्रॉफी म्हणून चांदीचा वीणा प्रदान केली. याशिवाय गौरीला शोची विजेती बनल्यानंतर गौरीला दीड लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. दुसरीकडे, उपविजेत्या श्रावणी आणि जयेश या दोघांना एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.






'सा रे ग मा प लिएल चॅम्प्स 2023' हा कार्यक्रम 9 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झाला. सुरेश वाडकर, वैशाली माडे आणि सलील कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचं परीक्षण केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडेने केले. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती.


संबंधित बातम्या:


Chandramukhi 2 : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम आर्या आंबेकर अन् कंगना रनौतच्या 'चंद्रमुखी 2'चं खास कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?