Gaurav More :  'फिल्डरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळख असलेला छोट्या पडद्यावरील विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) याने काही दिवसांपूर्वीच  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कॉमेडी शो सोडत असल्याची घोषणा केली होती. गौरव मोरे हा सध्या सोनी वाहिनीवरील 'मॅडनेस मचाऐंगे' या कॉमेडी शोवर झळकत आहे. हिंदीच्या मंचावरही गौरव मोरे आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवत आहे. मात्र, नेटकऱ्यांनी गौरवच्या एका व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. हिंदीवाल्यांनी तुला माकड केले असल्याचे युजर्सने म्हटले आहे. 


'मॅडनेस मचाऐंगे' या शोमध्ये बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावतने हजेरी लावली होती.  यावेळी गौरवने तिच्यासमोर आपला परफॉर्मेन्स सादर केला. यामध्ये गौरवने मल्लिकासमोर बेली डान्स केला. याच दरम्यान त्याने अंगावर पाणी ओतून घेतले. मल्लिकालाही गौरवचा हा परफॉर्मेन्स आवडला. पण, नेटकऱ्यांनी गौरववर टीकेची झोड उठवली आहे.  






नेटकऱ्यांकडून गौरवचं ट्रोलिंग... 


 गौरव मोरेच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले की, माकड करुन टाकला राव हिंदीवाल्यांनी... मराठी वाहिनीवर वर होता तेव्हा इतकं वाह्यात केलं नव्हतं... तर, दुसऱ्या एका युजरने गौऱ्याचा माकड केलाय, उद्या गांडुळ करतील असे म्हटले. बकवास भंकस एकदम..जोकर झालाय पार तुझा असेही एकाने म्हटले. हे सर्व करून शांत झोप लागते का...मी तर वेडा झालो असतो असेही एका युजरने म्हटले. एका युजरने महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील स्क्रिप्ट चांगली होती असे म्हटले. 







 



गौरववर टीका सुरू असताना दुसरीकडे त्याच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. एका युजरने लक्ष देऊ नको गौरव...काम करत रहा, असे म्हटले. काही युजर्सने छान परफॉर्मन्स करतोय असेही कौतुक केले. एका युजरने गौरव भावा तू स्टेजवर आग लावणार असे म्हटले.  काहींनी ज्यांना गौरवचा शो पटत नाही, त्यांनी पाहू नये असा सल्ला दिला आहे.


गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.  तर, काहींनी गौरवला पााठिंबा देत नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिलेल्या. 


इतर संबंधित बातमी :