मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबिता हिच्या अडचणी वाढ झाली आहे. अनुसुचित जातींबाबत केलेल्या एका टिप्पणीने तिची अडचण वाढली आहे. तिच्याविरूद्ध इंदूरच्या अजाक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपर्ण प्रकाराबद्दल पोलीस अधिक माहिती घेत आहेत. 


अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खुप अॅक्टिव आहे. त्यातच तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात तिने एका विशिष्ट जातीबद्दल आपत्तीजनक टिप्पणी केली होती. त्यावरुन तिच्यावर टीकेच झोड उठली आहे. अनेकांकडून तिच्यावर कायदेशीर कारवाई करुन अटकेची मागणी होत आहे. 


मुनमुन दत्ताचा माफिनामा


या प्रकरणी गुन्हा नोंद होण्यापूर्वीच अभिनेत्री मुनमुन दत्ताने माफी मागितली होती. मी माझ्या व्हिडीओत चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे अनवधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्या प्रत्येक व्यक्तीची क्षमा मागते. तसेच भाषेच्या अडचणीमुळे चुकीचा शब्द माझ्याकडून वापरला गेला होता आणि त्या शब्दाचा चुकीचा अर्थ मला सांगितला गेला होता, असं तिने आपल्या माफीनाम्यात म्हटलं.






हरियाणातही गुन्हा दाखल


हरियाणाच्या हांसी शहरात नॅशनल अलायन्स फॉर दलित ह्युमन राईट्सचे संयोजक रजत कलसन यांच्या तक्रारीवरून मुनमुन दत्ताविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हांसी पोलिसांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला. हे सर्व कलम अजामीनपात्र आहेत आणि या कलमांमध्ये अटकपूर्व जामिनाची देखील तरतूद नाही.