मुंबई: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रस्तावित बंदीबाबत एनडीटीव्ही इंडियाने आपलं म्हणणं मांडलं आहे.

"सरकारच्या आदेशामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पठाणकोट हल्ल्याबाबत प्रत्येक वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्राने केलेलं कव्हरेज एकसारखंच होतं. त्यामुळे सरकारने एनडीटीव्हीवरच कारवाईचा बडगा उचलणं हैराण करणारं आहे", असं एनडीटीव्हीने म्हटलं आहे.

पठाणकोट हल्ला: एका आघाडीच्या हिंदी चॅनलवर एका दिवसाची बंदी

एक दिवसाची बंदी

पठाणकोट हवाई हल्ल्याचं अतिसंवेदनशील आणि अतिप्रमाणात कव्हरेज केल्यानं एनडीटीव्ही हिंदी या वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण 1 दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे 9 नोव्हेंबरला एनडीटीव्ही हिंदीचं प्रसारण बंद ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

मीडिया क्षेत्रातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे..केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही हिंदीवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

जानेवारी महिन्यात पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी हल्ल्याचे वार्तांकन करताना मिग आणि लढाई विमानं, रॉकेट लाँचर्स या सगळ्याचा तपशील एनडीटीव्हीवर मांडण्यात आला होता.

संवदेनशील माहिती उघड केल्यानं देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. याप्रकरणी एनडीटीव्हीला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र सर्वच माध्यमातून अशा प्रकराची माहिती दाखवल्याचं एनडीटीव्हीने म्हटलं आहे.

एनडीटीव्हीचं स्पष्टीकरण जसंच्या तसं

सूचना एवं प्रसारण मंत्रालय का आदेश प्राप्‍त हुआ है. बेहद आश्चर्य की बात है कि NDTV को इस तरीके से चुना गया. सभी समाचार चैनलों और अखबारों की कवरेज एक जैसी ही थी. वास्‍तविकता में NDTV की कवरेज विशेष रूप से संतुलित थी. आपातकाल के काले दिनों के बाद जब प्रेस को बेड़ियों से जकड़ दिया गया था, उसके बाद से NDTV पर इस तरह की कार्रवाई अपने आप में असाधारण घटना है. इसके मद्देनजर NDTV इस मामले में सभी विकल्‍पों पर विचार कर रहा है.

संबंधित बातमी


पठाणकोट हल्ला: एका आघाडीच्या हिंदी चॅनलवर एका दिवसाची बंदी