आमची शुद्ध मैत्री
"मी आणि राजेशने काही चुकीचं केलं असं वाटत नाही. प्रेम, दोस्ती, बॉण्डिंग व्यक्त करण्याचा प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो. मी अशीच आहे. कॅमेऱ्यासमोर एक कॅमेऱ्यामागे एक वागत नाही. राजेश विवाहित पुरुष आहे, त्याला पत्नी, दोन मुली आहेत. त्याला त्याच्या लिमिट्स माहित आहेत आणि पाहिजेत. त्याला कोणाला तरी उत्तर द्यायचंय. अशा गोष्टींमध्ये मुलीचं नाव जास्त खराब होतं. मुलांपेक्षा मुलींवर जास्त परिणाम होतं. मी प्रेक्षकांना दोष देणार नाही. त्यांना जसं दिसलंय तसंच ते त्यावर रिअॅक्ट झाले आहेत. तर ते चुकीचं नाही. प्रेक्षकांनी जे पाहिलंय ते दीड तासाचं आहे. घरात 24 तासात जे घडलंय त्यापैकी बरंच प्रेक्षकांपर्यत पोहोचलं नाही. मी बाहेर आल्यानंतर या गोष्टी मला कळल्या. जे दाखवलंय त्यावरुनच प्रेक्षक विचार करणार की, यांचं अफेअर आहे. आमची शुद्ध मैत्री होती. मी आजही म्हणतेय तो माझा चांगला मित्र आहे. मी त्याला खूप आधीपासून ओळखते. त्याच्यासोबत माझा कम्फर्ट लेव्हल खूप चांगला होता," असं रेशमने सांगितलं.
राजेशने लिमिट्स क्रॉस केल्या
रेशम म्हणाली की, "राजेशने त्याच्या थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या हे बाहेर आल्यावर मला वाटतंय. तरी मी त्याला सांगायचे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुला होऊ शकतो. तो कॅमेऱ्यावर बायकोला बोलला त्यावेळी मी त्याला बोलले होते की, तुझी बायको घरी एकटी आहे, दोन मुली आहे. बायको बघेल, तुला आवडणार नाही, तू याला ओके आहेस का? तर तो म्हणाला होता की, माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे."
रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार
मला काहीच उत्तर द्यावं लागलं नाही
"माझा बॉयफ्रेण्ड आहे, तो मला आतून-बाहेरुन पूर्ण ओळखतो. आम्ही रिलेशनशिपमध्ये असण्यापेक्षा आम्ही बेस्ट फ्रेण्ड आहोत. माझा स्वभाव कसा आहे हे त्याला माहित आहे. बाहेर पडल्यानंतर त्याने मला मिठी मारली आणि तू माणूस म्हणून कशी आहेस हे मला माहित आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, असं म्हणाला. तिथेच विषय संपतो. मला काही उत्तर द्यावंच लागलं नाही," असंही रेशम टिपणीसने नमूद केलं.
आमच्याकडे एकमेकांचा फोन नंबरही नाही
रेशम पुढे म्हणाली की, "बाहेर पडल्यानंतर राजेश भेटला नाही. मी राजेशसोबत काम केल्यानंतर त्याला मुंबईत कधी भेटले नाही. विश्वास बसणार नाही, पण माझ्याकडे त्याचा फोन नंबरही नाही. त्याच्याकडेही माझा नंबर नाही. आम्ही खूप वर्षांनंतर भेटलो ते थेट बिग बॉसमध्ये. तिथे मला पूर्णपणे ओळखणारा मित्र भेटल्यानंतर कम्फर्ट लेव्हल असणारच ना."
संपूर्ण मुलाखत