बैलगाडीचं नॉमिनेशन टास्क या आठवड्यात स्पर्धकांना देण्यात आलं होतं. बैलगाडीवर बसून राहणारे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यानुसार रेशम, आस्ताद आणि स्मिता हे तिघे जण नॉमिनेट होते. त्यामुळे या तिघांपैकी कोण बाद होणार याची उत्सुकला लागली होती.
सुरुवातीला राजेश शृंगारपुरेसोबत तिच्या असलेल्या 'केमिस्ट्री'मुळे घरातील सदस्य आणि प्रेक्षकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. राजेशच्या एलिमिनेशननंतर मात्र रेशम इतर सदस्यांसोबत खेळीमेळीने वागायला लागली.
रेशम घरात किचनमध्ये हातभार लावत नाही, टास्कमध्येही तिचा सहभाग नसतो, असा आरोप मेघा, सई वारंवार करत होत्या. रेशम 'राणी' असून कायम ऑर्डर सोडत असल्याची कुजबूजही मेघा-सईच्या गटात व्हायची. या तक्रारींमुळे ती एलिमिनेट झाल्याची चर्चा आहे.
आस्ताद अंतिम फेरीत
दरम्यान घराबाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसला बिग बॉसने खास अधिकार दिला होता, ज्यानुसार कोणत्याही एका सदस्याला ती नॉमिनेशनपासून वाचवू शकते. त्यानंतर रेशमने आस्ताद काळेला सुरक्षित केले आणि म्हणूनच आस्ताद बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिमफेरीमध्ये पोहोचणारा दुसरा स्पर्धक ठरला.
तर पुष्करला या आठवड्यामध्ये 'तिकीट टू फिनाले' मिळाल्यामुळे तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामधील महाअंतिम फेरीमध्ये पोहचलेला पहिला स्पर्धक ठरला आहे. बिग बॉसच्या घरात आता पुष्कर जोगसह, मेघा धाडे, सई लोकूर, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर आणि शर्मिष्ठा राऊत हे स्पर्धक उरले आहेत.