Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Chhaava New Release Date : 'पुष्पा 2'मुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलली, निर्मात्यांसमोर नवीन तारीख शोधण्याचा मोठा पेच

Chhaava New Release Date : बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या छावा आणि अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2 चित्रपटाची टक्कर टळली आहे. पुढच्या महिन्यात सुपरस्टार अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2 : द रुल' आणि विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची टक्कर होणार होती. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार होते. पण, आता मोठी बातमी समोर आली आहे. विकी कौशलच्या छावा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

ऐश्वर्या रायचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, अभिषेक बच्चनसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना नापसंत; कोट्यवधींचं नुकसान झाल्यावर निर्माता 12 वर्षे गायब

Abhishek Bachchan Aishwarya Rai Flop Movie : विश्वसुंदरी आणि बॉलवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे भारतासह जगभरात लाखो चाहते आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने तिच्या करियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तर, तिचे काही चित्रपट फ्लॉपही ठरले होतं. यातील एक चित्रपट ऐश्वर्या रायच्या करियरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आणि तिच्या करियरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : फिर से ठोको ताली...! नवजोत सिंह सिद्धू यांची कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा एन्ट्री, अर्चना सिंहचं काय होणार?

The Great Indian Kapil Show :  'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये पुन्हा एकदा नवजोत सिंह सिद्धूची एन्ट्री होणार आहे. कपिलच्या शोमध्ये नवजोत सिंह सिद्धू यांची पत्नी नवजोत कौर सिद्धू यादेखील हजेरी लावणार आहेत. कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन प्रोमोमध्ये समोरील खुर्चीवर अर्चना पूरन सिंहच्या ऐवजी नवजोत सिंह सिद्धू बसल्याचं दिसत आहे. शोचा नवीन प्रोमो समोर आला असून हा आता प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

बापासारखी क्रिकेटर बनणार अनुष्का शर्माची लेक? वामिकाबद्दल विराट कोहली म्हणाला, "ती मस्त बॅट चालवते..."

Virat Kohli On Daughter Vamika : बॉलिवूड अभिनेत्री अनु्ष्का शर्मा सध्या तिच्या फिल्मी करियरमधून ब्रेक घेऊन मुलांच्या संगोपनासाठी वेळ देताना दिसत आहे. तर विराट कोहलीही क्रिकेटच्या सामन्यादरम्यानचा वेळ त्याच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त घालवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने अलिकडेच पती विराट कोहलीचा दोन्ही मुलांसोबतचा सुंदर फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिघांची एकत्र पहिली झलक पाहायला मिळाली. या फोटोमध्ये विराट मुलांसोबत वेळ घालवताना अत्यंत आनंदी असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं प्रकरण काय?

Actress Maria Susairaj : गुन्ह्याच्या काही अशा घटना समोर येतात, जे ऐकून माणूसकीवर विश्वास ठेवावा की नाही, हा प्रश्न निर्माण होतो. नीरज ग्रोवर हा तरुण बालाजी प्रोडक्शन हाउसमध्ये कास्टिंग डायरेक्टर होता. या दरम्यान, त्याचं अभिनेत्री मारियावर प्रेम जडलं. सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण, एक दिवस अचानक नीरज गायब झाला. त्याच्या काही थांगपत्ता लागत नव्हता, त्यामुळे अखेरीस हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिस तपासात जी माहिती समोर आली, त्यांने ऐकणाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Tharla Tar Mag : मधुभाऊंची झाली सुटका, गैरसमजाची वातही विझणार; सायली-अर्जुन साजरी करणार प्रेमाची दिवाळी!

Tharla Tar Mag :   स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. सायली आणि अर्जुनमध्ये झालेल्या गैरसमजामुळे त्यांच्या नातं पुन्हा एका वेगळ्याच वळणावर आलंय. अर्जुन मधूभाऊंची केस लांबणीवर टाकणार असल्याचा गैरसमज सायलीचा झाला आहे. त्यामुळे तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामध्ये गैरसमाजची वात पेटलीये. पण दिवाळीच्या दिवशी अर्जुन सायलीला खास भेट देऊन तिचे सगळे गैरसमज दूर करतो. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18: आरफीन खान बिगबॉसच्या घरातून बाहेर, पत्नी सारा रडली पडली, अविनाशचे पाय धरून मागितली माफी!

Bigg Boss 18: बिगबॉसच्या घरात विकेंड का वार म्हणजे नॉमिनेट झालेल्या स्पर्धकाच्या हाकलपट्टीचा दिवस. शनिवारच्या एपिसोडमध्ये बिगबॉसच्या घरातून आरफीन खानला बिगबॉसच्या घरातून निरोप देण्यात आला.  सगळ्यात कमी मतं मिळाल्यानं माइंड कोच बिगबॉसच्या घरातून बाहेर पडला. बिगबॉसच्या घरात आरफीन आणि त्याची पत्नी सारा खान या दोघांनी एकत्र प्रवेश केला होता.आरफीन घराबाहेर पडण्यासाठी पुढे जाताच सारा रडून गोंधळ घातल्याचं दिसलं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...