Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात सध्या नव्या आठवड्यातील टाईम गॉडचा किताब विवियनच्या हातातून हिसकवण्यासाठी नवा टास्क सुरू झालाय. हा किताब ज्या टीमला मिळेल त्या टीमचा सदस्य टाईम गॉडसाठी निवडला जाईल. तर दुसरीकडे या आठवड्यातील घराबाहेर जाणाऱ्या सदस्याची टांगटी तलवार आता 4 जणांच्या डोक्यावर आहे. मंगळवारच्या भागात बिग बॉसच्या घरात चार सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं.
विवियन डीसेनाने आठ सदस्यांना केलं नॉमिनेट
विवयाने रजत दलालला सर्वात आधी नॉमिनेट केले त्यानंतर चाहत पांडे आणि श्रुतिकाला नॉमिनेट केल्याचे दिसले. याचवेळी चाहतनेही याच शोमध्ये तुझा अहंकार तोडून टाकेन असं आव्हान दिलं. चाहतनंतर विवियनने श्रुतिका, करणवीर मेहरा, सारा, अरफिन खान ताजिंदर बग्गा आणि चुम दरांग यांचेही नाव घेतलं. पण यानंतर एक ट्विस्ट बिग बॉस ने आणला आणि घरातील चार सदस्य नॉमिनेट झाले आणि उरलेले वाचले.
कोणते सदस्य झाले nominate?
बिग बॉसच्या घरात टाईम गोड झालेल्या बेबी यांना नॉमिनेशनच्या अधिकार बिग बॉस ने दिले होते. यानंतर विवियनने घरातील आठ सदस्यांना नॉमिनेट केले. पण बिग बॉस ने एक ट्विस्ट आणत घरातील चार सदस्यांना सुरक्षित करत चार जणांना नॉमिनेट केले. यामध्ये चाहत पांडे, सारा खान, अरफिन खान आणि ताजींदर सिंग बग्गा हे चार सदस्य nominate झाले.
विवियनच्या मागे हात धुवून लागली चाहत
मागील अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या घरात चाहत पांडे आणि विवियन डिसेना यांच्यात वादावादी होत आहे . एकमेकांवर दोषारोप करण्याची संधी या दोघांपैकी एकही जण सोडत नसल्याचे दिसतय . आता विवियन टाईम गॉड झाल्यापासून चाहतही विवियनच्या मागे हात धुऊन लागली आहे. विवियनची कॉफी लपवत तिने जोपर्यंत आम्हाला चहा देण्यात येत नाही तोपर्यंत तुझी कॉफी मिळणार नाही असं म्हणत तिनं पुन्हा विवियनशी पंगा घेतलाय. या दोघांमध्ये यानंतरही चांगलीच वादावादी झाल्याचं दिसलं.