Vargamantri Trailler Lanch : राज्यात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) चुरस पाहायला मिळत आहे. इथे राज्याचा मुख्यमंत्री कोण? यासाठी निवडणुका घेतल्या जात आहेत. तर, अशीच दुसरी निवडणूक पार पडणार आहे. बरोबर ऐकलंत, राज्यात दुसरी निवडणूक पार पडणार आहे. शाळेतला वर्गमंत्री निवडण्यासाठी एक निवडणूक होणार आहे. मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री या वेब सीरिजची (Web Series) निर्मिती करण्यात आली आहे. अक्षया देवधर (Akshaya Deodhar), अविनाश नारकर (Avinash Narkar), नेहा शितोळे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. 8 नोव्हेंबरपासून ही वेबसेरीज आपल्या भेटीला येणार आहे.                               

  


अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेचे नरेंद्र फिरोदिया यांनी वर्गमंत्री या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. संजय श्रीधर कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजचं लेखन अजिंक्य म्हाडगूत, संकेत हेगाणा, प्रवीण कांबळे यांचं आहे. कृष्णा जन्नू यांनी संकलन, अजय घाडगे यांनी छायांकन, निरंजन पाडगावकर यांनी संगीत, श्रेयस एरंडे यांनी पार्श्वसंगीत, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.                                     


पाहा ट्रेलर :



विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नागरिकशास्त्राचे धडे मिळावेत, लोकशाही प्रक्रिया समजावी, यासाठी शाळांमध्ये निवडणूक घेतली जाते. अशीच वर्गमंत्री पदासाठीची निवडणूक घेण्याचं शाळा ठरवते. त्यानंतर विद्यार्थ्यांची उमेदवारी, अर्ज भरणं, प्रचार, मतदान अशा सर्व प्रक्रिया पार पाडताना उडणारी धमाल वर्गमंत्री या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. ट्रेलरमधूनच ही सीरिज मनोरंजक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 


दरम्यान, मराठी वेब विश्वात खास रे टीव्हीची वेगळी ओळख आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरचा अस्सल मराठी कंटेट खास रे टीव्हीनं आजवर सादर केला आहे. त्यामुळे आता वेब सीरिजच्या क्षेत्रातही वर्गमंत्रीसारखी खास निर्मिती लक्षवेधी ठरेल यात शंका नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Must Watch Series On NETFLIX: मनी हाईस्ट आणि स्क्विड गेम्सनंतर Netflix वर सर्वाधिक पसंती मिळालेले 8 थ्रिलर शो; List झटपट सेव्ह करा!