मुंबई : टीव्हीवरील सर्वाधिक चर्चित आणि वादग्रस्त बिग बॉस 11 शो अखेर संपला. अभिनेत्री शिल्पा शिंदे विजेती ठरली. तिने हिना खानला पराभूत केलं. हिनाचा पराभव झाला असला तरी तिला शिल्पा शिंदेपेक्षा जास्त पैसे मिळाल्याचं समोर आलं आहे.


एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, हिना खान बिग बॉसकडून तब्बल 1.75 कोटी रुपये मिळाले आहेत. तर विजेत्या शिल्पा शिंदेला 1.28 कोटी रुपयेच मिळाले. म्हणजेच पराभूत होऊनही हिनाला शिल्पापेक्षा 46 लाख रुपये जास्त मिळाले.

हिनाला 1.75 कोटी कसे मिळाले?
बिग बॉस 11 च्या करारानुसार, हिना खानला पहिल्या दहा आठवड्यांसाठी 1.25 कोटी रुपये मिळाले. मात्र त्यानंतर शेवटच्या पाच आठवड्यांसाठी तिला 50 लाख रुपये ज्यादा मिळाले. अशाप्रकारे हिना खानला 1.75 कोटी रुपये मिळाले.

विजेत्या शिल्पाला फक्त 1.29 कोटी कसे?
शिल्पा शिंदेच्या बिग बॉस 11 च्या करारानुसार, तिला पहिल्या दहा आठवड्यांपैकी प्रत्येक आठवड्यासाठी सहा लाख रुपये मिळाले. यानंतर उर्वरित पाच आठवड्यांपैकी प्रत्येक आठवड्यासाठी तिला पाच लाख रुपये मिळाले. यातून शिल्पाने 85 लाख रुपये मिळवले. शिल्पा बिग बॉस 11 जिंकल्यामुळे तिला बक्षीसाची रक्कम म्हणून 44 लाख रुपये मिळाले. अशाप्रकारे शिल्पाला एकूण 1.29 कोटी रुपये मिळाले.

हिनाला पुन्हा भेटणार नाही!
इतकंच नाही तर हिनाला पुन्हा कधीही भेटणार नाही, असंही शिल्पा शिंदे म्हणाली होती. घरात हिना आणि शिल्पामध्ये कधीच मैत्री झालेली दिसली नाही. आता घराबाहेर आल्यानंतरही शिल्पा हिनासोबत मैत्री करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही.