Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठी कालचा भाऊचा धक्का फारच जबरदस्त ठरला. रितेश भाऊनं घरात दादागिरी आणि माज दाखवणाऱ्या सदस्यांची चांगलीच जिरवली. रितेश भाऊनं निक्कीला झापलं आणि जान्हवीला तुरुंगात जाण्याची शिक्षा दिली. यानंतर आता आज भाऊच्या धक्क्यावर काय घडणार यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात आज खास पाहुणे हजेरी लावणार असून सदस्यांसोबत काही खेळही खेळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे.


घरातला आग लावणारा सदस्य डीपी दादा : छोटा पुढारी


'बिग बॉस मराठी'च्या आजच्या विशेष भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेला विचारणार आहे, "माचिसचं काम काय?". उत्तर देत छोटा पुढारी म्हणतो,"काडी लावणं". त्यावर रितेश भाऊ छोटा पुढारीला विचारतो,"बिग बॉस मराठी'च्या घरातला कोणता सदस्य आहे जो घरात आग लावायचं काम करतो?". रितेश भाऊला उत्तर देत छोटा पुढारी म्हणतो,"माझ्या मते, माचिस मी डीपी दादाला देऊ इच्छितो.. कारण निक्की आणि माझं जे भांडण झालं ते डीपी दादांमुळे झालं होतं". इतर सदस्य कोणतं चिन्ह कोणाला देणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहायला विसरू नका.


सदस्यांसमोर दुर्गाचे निडर प्रश्न!


'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली. तसेच भाऊच्या धक्क्यावर स्थान न देता तिला जेलची शिक्षादेखील सुनावली. आता आजचा भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आज भाऊच्या धक्क्यावर सदस्य निर्भीड दुर्गाच्या निडर प्रश्नांना सामोरे जाताना दिसून येतील.


बिग बॉस मराठी'च्या घरातला झपाटलेला सदस्य कोण?


'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात कंगना रनौत आणि श्रेयस तळपदे सदस्यांना चांगलच खेळवणार आहेत. आजच्या भागात श्रेयस वर्षा ताईंना विचारतो,"तुमच्यासाठी चित्रपटाचं नाव आहे 'झपाटलेला". त्यानंतर वर्षा ताई म्हणतात,"बिग बॉस मराठी'च्या घरातील झपाटलेला व्यक्ती वैभव आहे". त्यानंतर गॅसच्या फुग्याची हवा इन्हेल करुन वैभव एक खास डायलॉग म्हणतो". आजच्या भागात घरातील सर्वच सदस्यांचा बदललेचा आवाज ऐकताना प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : "प्रेम करुन बघितलं, गेम सारखंच वाटतंय, आता...", निक्की-अरबाजच्या नात्यात दुरावा? टीम ए फूट पडण्याची चिन्हं