Devoleena Bhattacharjee Delivers Baby Boy: टेलिव्हिजन अभिनेत्री (Television Actress) देवोलिना भट्टाचार्जीनं (Devoleena Bhattacharjee) चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. टेलिव्हिजन विश्वातील लाडकी 'गोपी बहू' आणि पती शानवाज शेख यांच्या आयुष्यात एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. देवोलिनानं स्वतः ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीनं एक छोटी क्लिप शेअर करून आपल्या मुलाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. चाहत्यांनाही गूड न्यूज ऐकून खूपच आनंद झाला असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनं 18 डिसेंबर रोजी आपल्या बाळाला जन्म दिला. देवोलिनानं सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
देवोलिना आणि शानवाज दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, "18 डिसेंबर रोजी आमच्या आनंदाची पोतडी, आमच्या बाळाच्या जन्माची बातमी देताना खूप आनंदी आहे." व्हिडीओचं कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, "हॅलो वर्ल्ड! हमारा नन्हा फरिश्ता लड़का यहां है...18/12/2024 (एसआईसी)।"
देवोलिनानं दिली आनंदाची बातमी...
देवोलिनानं 15 ऑगस्ट रोजी आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. या अभिनेत्रीनं डिसेंबर 2022 मध्ये जिम ट्रेनर शानवाज शेखसोबत लग्न केलं. तिनं पंचामृत विधीचे फोटो शेअर केलेले, गर्भवती महिलांसाठी ही पूजा केली जाते. जून 2024 मध्ये, देवोलिना भट्टाचार्जीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
2022 मध्ये बांधलेली लग्नगाठ
देवोलिना भट्टाचार्जीनं 2022 मध्ये जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्न केलं होतं. लाल साडीतील लूकमधले फोटो शेअर करत अभिनेत्रीनं लिहिलं होतं की, "होय... गर्वानं म्हणू शकते की, मी दिवा घेऊनही शोधलं असतं तरी तुझ्यासारखं कुणी मिळालं नसतं. तूच माझ्या दुःख आणि सुखाचा सोबती आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम. आम्हासाठी प्रार्थना करा. मिस्टीरियस व्यक्ती उर्फ द फेमस शोनू आणि तुमच्या सर्वांचा जिजू..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :