मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी आणखी एक छोटा पाहुणा आला आहे. आज म्हणजेच 1 फेब्रुवारीला पहाटे त्याच्या पत्नी गिन्नी चतरथने मुलाला जन्म दिला. कपिल शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांना शेअर केली आहे. कपिल शर्माचा ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप असल्याचं कपिलने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


कॉमेडी किंग Kapil Sharmaच्या घरी गूड न्यूज, गिन्नी-कपिल पुन्हा आई-बाबा बनणार!


The Kapil Sharma Show | 'द कपिल शर्मा शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप


कपिल शर्माने पहाटे साडेपाच वाजता ट्वीट करत लिहिलंय की, "नमस्कार, आज सकाळी आम्हाला देवाच्या आशीर्वादाच्या रुपात मुलगा मिळाला. ईश्वर कृपने बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहेत. प्रेम आणि प्रार्थनेसाठी तुम्हा सर्वांचे आभार, गिन्नी आणि कपिल." यासोबतच कपिलने #gratitude चा वापर केला आहे.





कपिल शर्माच्या या ट्वीटनंतर त्याच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


दरम्यान कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचा विवाह 12 डिसेंबर, 2018 रोजी पंजाबच्या जालंधरमध्ये झाला होता. कपिलला एक मुलगी असून डिसेंबर 2019 मध्ये तिचा जन्म झाला होता. आज त्यांनी दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं.