The Kapil Sharma Show :  कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma  'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमाचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या नव्या सीझनमध्ये जुन्य सीझनमधील काही कलाकार आहेत, तर काही नव्या कलाकारांची एन्ट्री देखील या सीझनमध्ये होणार आहे. नव्या सीझनमध्ये अभिनेता कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) सहभागी होणार नाही. आता अभिनेता चंदन प्रभाकर (chandan prabhakar) नं देखील  (Chandan Prabhakar) हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चंदननं हा शो सोडण्याच्या निर्णयामागील कारणं देखील सांगितलं आहे. 


द कपिल शर्मा शोमध्ये चंदन प्रभाकर वेगवेगळ्या भूमिका साकारतो. तो या शोमध्ये हवालदार हरपाल सिंह, झंडा सिंह, राजू आणि चंदू चायवाला या भूमिका साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवतो. पण चंदन आता या शोमध्ये सहभागी होणार नाही. त्यानं एका मुलाखतीमध्ये कपिल शर्मा शो सोडण्याचं कारणं देखील सांगितलं आहे. 


काय म्हणाला चंदन? 
'मी कपिल शर्मा शोच्या या सिझनमध्या काम करणार नाही. त्यामागे कोणतेही खास कारण नाही. मला फक्त ब्रेक घ्यायचा आहे.' असं एका मुलाखतीमध्ये चंदननं सांगितलं आहे. कपिलनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर द कपिल शर्मा शोच्या नव्या सिझनचा प्रोमो शेअर केला होता. प्रोमो व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी कपिलला या नव्या सीझनसाठी शुभेच्छा दिल्या.


23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. आता त्याचा नवा सीझन 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.  'द कपिल शर्मा शो' च्या नव्या सीझनमध्ये सुमोना चक्रवर्ती, कीकू शारदा,सिद्धार्थ सागर, सृष्टी रोडे गौरव दुबे, इश्तियाक खान आणि श्रीकांत मस्की हे कलाकार काम करणार आहेत. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कपिल पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण टीमसह सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या नव्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: