Chala Hawa Yeu Dya : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम मागील 10 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. पण आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान चॅनलकडून या कार्यक्रमाला निरोप देण्याआधी पुन्हा एक मोठी अपडेट समोर आलीये. कारण आम्ही या कार्यक्रमाला निरोप देत आहोत तेही पुन्हा परत येणाच्या वचनासोबत असं म्हटलं आहे. त्यामुळे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सुरु होणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
रविवार 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित केला करण्यात येणार आहे. पण यावर बोलताना चॅनलने सांगितलं की, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा शेवटचा भाग जरी प्रसारित होणार असला तरी प्रेक्षकांनी निराश होऊ नका. कारण एका अल्पविरामानंतर हा कार्यक्रम तुमच्या त्याच लाडक्या टीमसोबत पुन्हा एकदा हसवायला आणि तुमचं मनोरंजन करायला सज्ज होणार आहे.
कार्यक्रमाने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या टप्प्यावर नेला - व्ही.आर. हेमा
'चला हवा येऊ द्या' ह्या रिऍलिटी शोबद्दल बोलताना झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर ‘व्ही.आर. हेमा’ म्हणाल्या, "चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमाने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या टप्यावर नेऊन ठेवला आहे. ह्या टीम मधल्या प्रत्येकानी लोकांच्या हृदयात आपलं घर निर्माण केले. वाहिनीसोबत असलेलं ह्यांचं नातं हे अलौकिक आहे. तुमच्या लाफ्टर डोसचा बुस्टर डोस घेऊन ही टीम तुमच्यासाठी नव्या जोमात परत येणारआहे".
झी मराठी वरील नव्या मालिकेतील कलाकार दिसणार शेवटच्या भागात
झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी शिवा आणि पारु या दोन नव्या मालिका सुरु झाल्या आहेत. याच मालिकेतील कलाकार हे चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत. या अखेरच्या भागात झी मराठी परिवारात दाखल झालेले आणि नव्याने दाखल होणाऱ्या मालिकांचे म्हणजेच 'पारू', 'शिवा', 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि 'नवरी मिळे हिटलरला'चे प्रमुख कलाकार 'चला हवा येऊ द्या' च्या टीम सोबत आपल्याला मंचावर डान्स आणि विनोदाची अतिशबाजी करताना दिसणार आहेत.