Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये लवकरच बच्चे कंपनी हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमामध्ये बच्चेकंपनीची एन्ट्री होणार आहे. सध्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बच्चे कंपनी 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर खेळताना दिसत आहेत.
झी-मराठी आणि मायरा वैकुळ यांच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.या व्हिडीओमध्ये सर्व बच्चे कंपनी हे 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर खेळताना दिसत आहेत. 'चला हवा येऊ द्या' च्या सेट वर बच्चे कंपनीने कब्जा केला आहे.' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. ' या व्हिडीओमध्ये बम बम बोले मस्ती में डोले हे गाणं ऐकू येत आहे.
'चला हवा येऊ द्या'या शोच्या एका प्रोमोमध्ये मायरासोबतच इतर लहान मुलं 'लहान तोंडी मोठा घास'असं म्हणताना दिसत आहेत. आता 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर या बच्चेकंपनीची कॉमेडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
पाहा व्हिडीओ:
'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये काही बाल कलाकारांची एन्ट्री होणार आहे. यामध्ये माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा वैकुळचा देखील समावेश आहे. मायराला इन्टाग्रामवर 561K एवढे फॉलोवर्स आहेत. मायरा ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. आता 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये मायराला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
'चला हवा येऊ द्या' या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके हे कलाकार 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता या कार्यक्रमामध्ये बच्चेकंपनीची एन्ट्री होणार असल्यानं, कॉमेडीचा डबल डोस प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: