इंद्रवर्धन-माया, साहिल-मोनिशा, रोसेश या साराभाई कुटुंबातील सदस्यांवर अनेकांनी प्रेम केलं. नुकतंच इंद्रवर्धनची व्यक्तिरेखा साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांच्या घरी टीममधील कलाकारांचं रियुनियन झालं होतं. त्याचा फोटो दिग्दर्शक जमनादास मजेठिया यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. साराभाईच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सतीश शाह (इंद्रवर्धन), रत्ना पाठक-शाह (माया) आणि त्यांचे पती, अभिनेते नसरुद्दीन शाह, सुमीत राघवन (साहिल), रुपाली गांगुली (मोनिशा), राजेशकुमार (रोसेश), निर्माते जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया उपस्थित होते. दुष्यंतची व्यक्तिरेखा साकारणारा, मालिकेचा दिग्दर्शक देवेन भोजानीची मात्र या फोटोत उणीव भासते.
https://twitter.com/JDMajethia/status/748235546988675072
8 नोव्हेंबर 2004 रोजी स्टार वन चॅनलवर या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित झाला होता. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही साप्ताहिक मालिका अवघ्या 69 एपिसोड्सनंतर 10 मार्च 2006 ला बंद करण्यात आली. त्यावेळी या मालिकेचा दुसरा सिझन आणणार असल्याची चर्चा होती. दहा वर्षांच्या काळात सोशल मीडियावर विविध ग्रुप तयार करुन वारंवार ही मालिका पुन्हा सुरु करण्याची मागणी फॅन्सकडून केली जात होती.